Pages

Saturday, June 6, 2020

बाळ गंगाधर टिळक

   
                 

                   बाळ गंगाधर टिळक 


( १ ) सामान्य जनतेशी जवळचा संपर्क ठेवणारे टिळक हे पहिले राष्ट्रीय नेते होते .
( २ ) देशासाठी तुरुंगात जाणारे टिळक हे पहिले काँग्रेस नेते होते .
( ३ ) टिळकांनी सर्वात प्रथम स्पष्ट शब्दात स्वराज्याची मागणी केली .
        स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या त्यांच्या घोषणेने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण पसरले .
( ४ ) ' लोकमान्य ' व ' भारताचा अनभिषिक्त राजा ' (Uncrowned King of India ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकांनी जनतेमध्ये देशभक्तीची भावना रुजविली व काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीला व्यापक जनाधार मिळवून दिला .


>  जनतेला संघटित करण्यासाठी त्यांनी आखाडे ,
लाठीक्लब , गो वध विरोधी संस्था गणपती व शिवाजी उत्सव सुरु केले .


>  टिळकांचा काँग्रेसमधील मवाळ गटाला विरोध होता . त्यामुळे त्यांनी बिपिनचंद्र पाल व लाला लजपतराय यांच्यासोबत ' जहाल गेट ' निर्माण केला .


>  त्यांच्या प्रयत्नांमुळे १ ९ ०६ च्या कोलकाता अधिवेशनात
' स्वराज्य , बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ' हे ठराव संमत करण्यात आले .


>  टिळकांची मागणी स्वराज्याची होती . ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीचे शासन त्यांना मान्य नव्हते .


>  टिळाकांची विचारपद्धती स्पष्ट होती . बोलणे रोखठोक व सडेतोड होते कारण उद्दिष्ट पक्के होते पण त्यांच्या या वागण्याने ब्रिटिश नोकरशाही रुष्ट होती .
' व्हेलेंटाइन चिरोल ' यांने टिळकांचा ' भारतीय असंतोषाचे जनक ' असे - संबोधले . टिळकांनी त्याच्यावर मानहानीचा खटला टाकला त्यासाठी ते इग्लंडला गेले होते .


>  पहिल्या युद्धाच्या काळात त्यांनी जनतेला आवाहन केले की , त्यांनी युद्धकाळात ब्रिटिशांना सहकार्य करावे . कारण त्यानंतर स्वशासनाचे अधिकार मिळतील असे त्यांना
 वाटायचे .


>  टिळकांना राजकीयदृष्ट्या जहालवादी पण सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मवाळवादी मानले जाते .
( Extremist in Politics but a moderate in Social Reforms )


>  त्यांनी संमतीवयाच्या कायद्याचा विरोध केला तो या भूमिकेतून की , आमच्या सामाजिक सुधारणा आम्ही कर , त्याबाबत परकीयांना कायदे करण्याचा अधिकार नाही .


>  देश पारतंत्र्यात खितपत असतांना खऱ्या समाजसुधारणा शक्य नाही म्हणून प्रथम राजकीय अधिकारप्राप्तीसाठी समाजाची जागृती व संघटना आवश्यक आहे . एकदा स्वशासनाचे अधिकार मिळाले की , समाजसुधारणा सहजपणे करता येतील .


>  बॅरिस्टर जीना टिळकांना गुरुस्थानी मानत इतकेच नव्हे तर त्यांच्या अंत्ययात्रेवेळी जीनांनी त्यांना खांदा दिला


>  गांधीनी अंगिकृत केलेले - बहिष्कार , स्वदेशी , जनआंदोलन या धोरणांचा उगम टिळकांच्या विचारसरणीत व कार्यात दिसते.


>  टिळक हे निष्णात गणितज्ज्ञ होते , ' भाषातज्ज्ञ होते . भारतीय धर्मग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता .


>  गोखले हे काळाच्या बरोबर होते तर टिळक काळाच्या पुढे होते " - पी . सीतारामय्या.


>  टिळक हे मला उत्तुंग हिमालयासारखे वाटले ' - म. गांधी.


>  "धडाडी,  स्वार्थत्याग , कष्टाळूपणा , राजकी मुत्सद्देगिरी व व्यवहारी वृत्ती या सर्वांचा समावेश टिळकांमध्ये होता अरविंद घोष.


>  टिळकांच्या जीवनाचा कालपट 

• जन्म २३ जुलै १८५६ रत्नागिरी , चिखली .

• मूळ नाव - केशव .

• १८७६ - बी . ए .

• १ जानेवारी १८८० - न्यू इंग्लिश स्कूल - टिळक , आगरकर , चिपळूणकर .

• मराठा ( इंग्रजी ) -२ जानेवारी १८८१ संपादक टिळक .

• ४ जानेवारी १८८१ - केसरी ( मराठा ) - संपादक - आगरकर .

• २४ ऑक्टोबर १८८४ - डेक्कन एज्यूकेशन सोसायटी - टिळक , आगरकर .

• २ जानेवारी १८८५-- फर्ग्युसन कॉलेज ( डेक्कन एज्यूकेशन सोसायटीद्वारे ) .

• १८८७ आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिल्याने संपादक - टिळक .

• १८८ ९ - टिळकांचा काँग्रेस प्रवेश ,

• १८ ९ ० - डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचा राजीनामा .

• 1८ ९ ३ - सार्वजनिक गणपती उत्सव ,

• 1८ ९ ५ - शिवजंयती उत्सव .

• ५८९ ७ - नवनियुक्त प्लेग कमिशनर रंडचा खून झाल्यावर टिळकांचे काही जहाल लेख केसरीमध्ये प्रकाशित झाले .

• 6 जुलै - सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

• १३ जुलै - राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे .

• सप्टेंबर १८ ९ ७ - टिळकांना १८ महिन्यांची सक्तमजूरीची शिक्षा

• ६ सप्टेंबर १८ ९ ८ - सुटका

• २४ ऑगस्ट १ ९ ०२ - ताईमहाराजांच्या खटल्यात दोषी ठरून दीड वर्षे सक्तमजूरी व १००० रु . दंडाची शिक्षा .

• १ ९ ०५ - स्वदेशी चळवळ सुरु करुन - स्वराज्य , स्वदेशी ; बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु : सूत्रीचा पुरस्कार केला .

• १ ९ ०८ - खुदीरामच्या बॉम्ब खटल्यावरून केसरीत लेख लिहिले . ' देशाचे दुर्दैव ' व ' हे उपाय टिकावू नाहीत यावरून राजद्रोहाच्या खटला . ६ वर्षे शिक्षा व १००० रु दंड .

• १७ जून १ ९ १४ टिळकांची तुरुंगातून सुटका वाहन

• १ ९ १६ लखनौ काँग्रेस , होमरुल चळवळ .

• १ ९ सप्टेंबर १ ९ १८ विलायतेस रवाना .

• १ ऑगस्ट १ ९ २० मृत्यू .



> ग्रंथसंपदा 

        ( १ ) द ओरायन ( रिसर्चेस इन टू द ॲटिक्कीटीझ ऑफ वेदाज - १८ ९ ४ )
        ( २ ) आर्क्टिक होम इन द वेदाज ( १ ९ ०३ )
        ( 3 ) Haldean & Indian Vedas ( 1915 )
        ( ४ ) श्रीमद्भगवत गीतारहस्य ( १ ९ १३ )



आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.