बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांच्या जीवनाचा कालपट -
> जन्म - १४ एप्रिल १८ ९ १ ( महू . म.प्र . )> १ ९ १३ - एलिफिन्स्टनमधून बी.ए. ( पर्शियन व इंग्रजी )
> जुलै १ ९ १३ - सयाजीराव गायकवाड - यांच्या मदतीने - अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश
> १ ९ १५ - कोलंबियातून एम.ए.
( मुख्य विषय - अर्थशास्त्रातील प्राचीन भारतातील व्यापार)
1989 Phd Hit The National Dividend of India - A Historical & Analytical study
> १ ९ १७ ला Ph.del
> जून १ ९ १६ - इंग्लंडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्सला प्रवेश घेण्यासाठी
> जुलै १ ९ १७ - बडोदे सयाजीराव महाराज यांचे मिलट्री रोक्रेटरी म्हणून
> नोव्हें . १ ९१८- मुंबईस सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक म्हणून साऊथबरो कमिटीसमोर साक्ष ( १ ९ १ ९ ) - अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे असा विचार सर्वप्रथम मांडला . यावेळी कमिटीसमोर अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यासाठी वि . रा . शिंदे व डॉ . आंबेडकर यांची सरकारने निवड केली होती . यावेळी सर्वप्रथम सर्वच भारतीयांना मतदानाची अधिकार मिळाला पाहिजे ही मागणी त्यांनी केली होती .
> जाने . १ ९ २० - ' मूकनायक साप्ताहिक'.
> सप्टें . १ ९ २० - पुन्हा लंडनमध्ये .
• माणगाव ( कोल्हापूर ) - बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची परिषद ( शाहू महाराज उपस्थित )
> जून १ ९ २१ - लंडन विद्यापीठाची - एम.एस्सी .
• Provincial Decentalisation of Imperial Finance in British India
> १ ९ २२ - जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास
> मार्च १ ९ २३ . - लंडन विद्यापीठाची D.Sc. पदवी मिळवणारे पहिले भारतीय .
• विषय - The Problem of Rupee - Its origin & its solutions हाच प्रबंध १ ९ ४७ ला - History of Indian Currency & Banking म्हणून प्रसिद्ध .
> जून १ ९ २३ - मुंबई येथे हायकोर्टात वकिलीला सुरुवात
> १ ९ २४ - बहिष्कृत हितकारिणी सभा
> १ ९ २६ - मुंबई प्रांत लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे सदस्य
> मार्च १ ९ २७ - महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह .
१ ९ २३ ला मुंबई कायदेमंडळात सिताराम बोले यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव मांडला . तो मंजूर होऊन सरकारने ११ सप्टेंबर १ ९ २७ ला आदेश काढला . त्याचा फार उपयोग झाला नाही . अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी महाडला अधिवेशन घेतले .
> एप्रिल १ ९ २७ - ' बहिष्कृत भारत ' पाक्षिक
> २५ डिसेंबर १ ९ २७ - ' मनुस्मृति ' दहन . यावेळी महाडला सत्याग्रह परिषद होती . स्वागताध्यक्ष दिपू गायकवाड
होते . अनंत चित्रे , सुरमा टिपणीस यांचा सहभाग होता .
> मे १ ९ २८ - इंडियन स्टॅट्युटरी कमिशन
( सायमन कमिशन ) समोर साक्ष
> ३ मार्च १ ९ ३० - काळाराम मंदिर , नाशिक सत्याग्रह १ ९ ३४ पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता . यात स्त्रियांनी भाग घेतला होता . शेवटी बाबासाहेबांच्या आदेशावरून हा सत्याग्रह मागे घेण्यात आला .
> डिसें . १ ९ ३० - जनता साप्ताहिक
> १ ९३०-३२ - गोलमेज परिषदेसाठी - लंडनला
> सप्टें . १ ९ ३२ - पुणे करार
> १ ९३२-३४ - भारताला - सुधारणेचा १ ला हप्ता देण्यासाठी नेमलेल्या जॉइंट पार्लमेंटरी कमिटीचे सभासद
> सप्टें . १ ९ ३५ - येवला येथे ' हिंदूधर्म ' सोडण्याचा निर्णय " मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही . "
> १५ ऑगस्ट १ ९ ३६ - ' इंडिपेंडन्ट लेबर पार्टी ' स्थापन .
( स्वतंत्र मजूर पक्ष ) . दलितांच्या हक्कांचा लदा राजकीय पातळीवर लढवण्यासाठी पक्षाची स्थापना . १ ९ ३७ च्या निवडणुकात पक्षाने १३ जागा जिंकल्या .
> जाने . १ ९ ३७ - मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर सभासद म्हणून निवड ,
> एप्रिल १ ९ ४२ - All India Scheduled cast फेडरेशनची स्थापना .
> जुलै १ ९ ४२ - ग.ज. च्या Exevutive कौन्सिलवर - मजूरमंत्री म्हणून
> जुलै १ ९ ४५ - पीपल्स एज्युकेशन सोसायटी , मुंबई स्थापन
> १ ९ ४५ ला गरीब व होतकरू अशा २० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी उच्च शिक्षणासाठी इंग्लंड व अमेरिकेला पाठवली .
> एप्रिल १ ९ ४६ - सिद्धार्थ कॉलेजची स्थापना , मुंबई
> १ ९ ४७ - कायदामंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात नेमणूक
> नोव्हें . १ ९ ४८ - घटना समितीस मसुदा सादर
> जून १ ९ ५० - औरंगाबाद - मिलिंद कॉलेज स्थापन ( पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे )
> १ ९ ५२ - राज्यसभा सदस्य
> मे १ ९ ५३ - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड इकॉनॉमिक्स , मुंबईत
> डिसें . १ ९ ५४ - रंगून येथील जागतिक बौद्ध परिषदेस हजर
> मे १ ९५५- भारतीय बौद्ध महासभा स्थापन
> में १ ९ ५ ६ - सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ , मुंबई स्थापन
> १४ ऑक्टो . १ ९ ५६ -नागपूर - बौद्ध धर्माचा स्वीकार
> ६ डिसें . १ ९ ५६ - दिल्ली- महापरिनिर्वाण
> मूकनायकच्या शीर्षभागी - संत तुकारामांची वचने असत तर बहिष्कृत भारतच्या शीर्षभागी - संत ज्ञानेश्वरांची .
" समाजाच्या खालच्या पातळीवरील लोकांना मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन प्राप्त होणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ
आहे . " आंबेडकरांचा एकूण दृष्टिकोन - ' राष्ट्रवादी व मानवतावादी ' असा होता . सर्व धर्माच्या अस्तित्वासाठी निधर्मी राज्य ते तत्वत : मान्य करतात .
डॉ . बाबासाहेबांचे विचार -
• " देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे . "
• " अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे .
• " भिक्षेने गुलामगिरी मिळते - स्वातंत्र्य नाही . "
• " लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे की , ज्याद्वारे रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले जातात . "
> बाबासाहेबांच्या मते भारतीय लोकशाहीच्या उणिवा - जातिव्यवस्था , आर्थिक - सामाजिक न्यायाची
आवश्यकता ,
• विभूतीपूजा ,
• सहिष्णूतेचा अभाव , .
• जातिव्यवस्था ,
• आर्थिक - सामाजिक न्यायाची आवश्यकता
• संघर्षाची तयारी नाही ,
• कमी जागरुकता .
> डॉ . बाबासाहेब तीन जणांना गुरू मानत -
( १ ) गौतम बुद्ध ,
( २ ) म . फुले व
( ३ ) संत कबीर
> डॉ . बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित होते .
> मार्क्सचे संपूर्ण राजकीय तत्वज्ञान - त्यांना मान्य नव्हते . त्यांच्या मते माणूस हा इतिहासाचा निर्माता आहे . " आर्थिक शक्तिप्रवाह शेवटी माणसाच्या इच्छेने व मनाने कार्यान्वित होत असतात . "
> धर्म मानवाचा उदात्त वारसा आहे . मानवी जीवन व समाजरचना सुधारण्यामध्ये धर्म महत्वाची भूमिका बजावू शकतो - पैगंबर , बुद्ध , नानक , कबीर इ .
• संकुषित धार्मिकता त्यांना मान्य नव्हती . त्यांच्यामते कायद्यापुढे सर्व धर्म समान असावे , स्वतंत्र भारताचे उद्दिष्ट निधर्मी राज्य असावे . तसेच समाजातील सर्व सामाजिक तु नैतिक सुधारणा सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबून असतात असे ते म्हणत .
> समाजातील सर्व सामाजिक सुधारणा व नैतिक सुधारणा लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबून ,
ग्रंथक्रम -
• प्राचीन भारतीय व्यापार - १ ९ १५• भारतीय जातिसंस्था , तिची यंत्रणा , उत्पत्ती व विकास - १ ९ १६
• भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथक्षरणात्मक परिशीलन ( १ ९ १६ )
• The Evolution of Provincial Finance in British India - १ ९ २४ ( इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया )
• Casts in India - १ ९ २४ ( कास्टस इन इंडिया )
• Annihilation of Cast - १ ९ ३७ ( अॅनहिलेशन ऑफ कॉस्ट )
• Thoughts on Pakistan - १ ९ ४० ( थॉटस ऑन पाकिस्तान )
• Ranade , Gandhi & Jina - १ ९ ४३ ( रानडे , गांधी व जीना )
• काँग्रेस व गांधी यांनी अस्पृश्य वर्गास कसे वागवले -
१ ९ ४५
• Who were the shudras - १ ९ ४६ हा ग्रंथ म . जोतीबा फुले या आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ शूद्रास अर्पण केला .
• The untouchables - १ ९ ४८ ( द अनटचेबल्स )
• Thoughts on lingvistatic states - 9844 • Bhuddha & his dhamma - १ ९ ५७ - मरणोत्तर प्रकाशित ( बुद्ध अॅण्ड हिज धम्म )
• Riddles in Hinduism - १ ९ ५७ ( रिडल्स इन हिंदूइझम )
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन -
> डॉ . आंबेडकरांनी - अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी अत्यंत सखोल अध्ययन केले होते .
> आफ्रिका - अमेरिकेतील निग्रो समाज , रोमन साम्राज्यातील गुलाम समाज किंवा ज्यू समाज असो , प्रत्येक समाजव्यवस्थेचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता .
> अस्पृश्यतेचा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास
केला .
> गुलामगिरी व अस्पृश्यता यांची तुलना करताना डॉ . बाबासाहेग म्हणतात ,
> " गुलामीची पद्धत ही अस्पृश्यतेच्या तुलनेत चांगली आहे . कारण गुलामांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची संघी होती ; पण अस्पृश्यांना मात्र आपल्या व्यक्तिमत्वांचा विकास करण्याची संधी सुद्धा नव्हती . "
> गुलामगिरी बंधनकारक नव्हती अस्पृश्यता बंधनकारक आहे .
> अस्पृश्यता ही मुक्त नसलेली - बंदिस्त समाजव्यवस्था
आहे .
> गुलामी करण्याची सक्ती नव्हती ( ऐच्छिक प्रकार ) पण अस्पृश्यता निवडून घेण्याचा प्रकार नव्हता तो जन्मतःच चिकटलेला होता .
> अस्पृश्यता ही अप्रत्यक्ष गुलामी असून , गुलामीपेक्षाही तो सर्वात वाईट प्रकार आहे .
> अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे जातिव्यवस्था नष्ट करणे - जात नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही , असे त्यांचे स्पष्ट मत होते
> अस्पृश्यतेवरील बाबासाहेबांचा सविस्तर ग्रंथ -
(1) The Untouchables ,
(2)who are they & why they become untouchables ? ( १ ९ ४८)
> आपल्या संशोधनातून ते है स्पष्ट करतात की अस्पृश्य हे मूळचे वाताहात झालेले लोक ( Broken Man )
आहेत .
> अस्पृश्य असल्यामुळे त्यांना हद्दपार करून व्यायाबाहर राहाण्यास भाग पाडले नाही , तर ते सुरुवातीपासूनच गावाबाहेर राहत होते . कारण ते वाताहत झालल अंक हात व स्थिर झालेल्या टोळीपेक्षा ते वेगळ्या टोळीतील होते .
> स्टॅनले राइस - यांनी अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा वरभेदावर आधारित व व्यवसायावर आधारित असे दोन सिद्धांत मांडले .
> डॉ. बाबासाहेबांनी या सिद्धांताचे खंडन केले - स्वतःचे काही विचार मांडले .
( १ ) बौद्ध धर्माबद्दलचा तिरस्कार हे अस्पृश्यतेचे मूळ
आहे . जे बौद्धधर्मिय होते . त्यांच्याबद्दल ब्राह्मणांनी पसरवलेला द्वेष व तिरस्कार हे अस्पृश्यतेच्या उगमाच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे .
( २ ) गोमांस भक्षण - पूर्वी यज्ञात बळी जाणाऱ्या प्राण्यांचे मांस पुजारी खायचे . पण बौद्ध धर्मात - पशुबळीचा तीव्र विरोध , बौद्ध धर्माचा लोकांवर इतका प्रभाव पडला की , वाताहात झालेले लोक देखील बौद्ध धर्माचे अनुयायी झाले . त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करण्यासाठी - ब्राह्मण वर्गान - मांस खाणे सोडून ते पूर्ण शाकाहारी झाले . पण वाताहत झालेल्या लोकांनी - गोमांस खाणे सुरू ठेवल्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना अस्पृश्य ठरवले .
> समता , स्वातंत्र्य , बंधुत्व या तत्त्वावर आधारित असलेली न्यायाची कसोटी व सामाजिक उपयुक्ततेची कसोटी या दोन्ही कसोट्यांवर बौद्ध धर्म खरा उतरतो असे त्यांचे मत होते .
> आदर्श समाज हा स्वातंत्र्य , समता , बंधुता या संकल्पनांवर आधारित असावा .
> १ ९ २० पासून ते १ ९ ५६ पर्यंत त्यांनी भारतीय समाजात बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले पण त्यांच्या लक्षात आले की , व्यक्तीच्या श्रद्धा - परंपरा बदलल्याशिवाय कोणतेही परिवर्तन होऊ शकत नाही . म्हणून त्यांनी बौद्ध धम्माचा मार्ग स्वीकारला .
> चार्तुवर्ण्य व जातिव्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्थेचा त्याग करून समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा तो एक महत्त्वाचा पैलू होता .
> बहिष्कृत हितकारिणी सभा ( २० जूलै १ ९ २४ ) मुंबई
येथे .
• या सभेचे ब्रीदवाक्य होते शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा ,
• उद्दिष्टे - समाजात जागृती निर्माण करणे , मानवी हक्कांचे संरक्षण करणे , शिक्षण देणे , आर्थिक स्थिती सुधारणे
इ .
• सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ . बाबासाहेब
होते . तर सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते .
> सायमन कमिशन - बाबासाहेबांनी सायमन कमिशनला दोन खलित पाठवली .
( १ ) अस्पृश्यांच्या हक्कांसंबंधी
( २ ) मुंबई प्रांतात कोणते राजकीय हक असावेत
याबाबत , सायम कमिशनने अस्पृश्यांना राजकीय हक्क द्यावेत अशी शिफारस केली पण त्यातील तरतूर्दीना बाबासाहेबांनी विरोध केला . महारांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी १ ९ मार्च १ ९ २८ ला मुंबई कायदेमंडळात ' महार वतन बिल ' मांडले .
> १ ९ १८ साली बाबासाहेबांनी ' स्मॉल होल्डिंग इन इंडिया ' हा शोधनिबंध लिहिला होता . त्यात त्यांनी जास्त संततीमुळे होणारे शेतीचे तुकडे व त्यामुळे उभे राहणारे प्रश्न यांची चर्चा केली होती .
> १ ९ ३८ ला त्यांनी कुटूंब नियोजनाचा आग्रह धरत त्यासाठी कायदा करावा म्हणून विधिमंडळात विधेयक आणले ,
> २० जूलै १ ९ ४२ ला बाबासाहेब म्हणाले होते की , कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली जाते . हिंदु कोड बिलाद्वारे सर्व स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी ते
लढले ,
> ओबीसीच्या प्रगतीसाठी : १ ९ ३० ला त्यांनी स्टार्ट कमिटीच्या अहवालात त्यांना आरक्षण व कायदेशीर संरक्षण देण्याची शिफारस केली .
> मराठवाडा मुक्तिसंग्राम व डॉ . बाबासाहेबांची भूमिका
• निझाम राजवटीत पश्त आकाम ही संघटना होती . या संघटनेतील काही दलित नेते या राजवटीचे समर्थनकरत , हैद्राबादमधील दलित नेते व्यंकटराव व शामसुंदर हे जहाल भाषेत दलितांना प्रक्षोभित करून निझामावरील निष्ठा व्यक्त करत , पण संस्थानचे सर्व दलित ' पश्त अवाम'मध्ये नव्हते . स्टेट काँग्रेस , आर्य समाज हिंदु महासमा यातही पुष्कळ दलित कार्यकर्ते होते .
• डॉ . बाबासाहेबांचा व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा
( SCF ) स्वांतत्र्य संग्रामाला पाठिंबा होता . नांदेडला SCF द पश्त अक्रामच्या कार्यकांत संघर्ष झाल्याची नोंद आहे .
• बाबासाहेबांनी संस्थांनातील जनतेला आवाहन केले की , त्यांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे . निझाम हा भारताचा शत्र आहे म्हणून अनुसूचीत जातीतील एकाही माणसाने निझामाची बाजू घेऊन आपल्या समाजाला काळिमा फासू नये अशी विनंती त्यांनी केली होती .
' निझाम हा शत्रू आहे . त्याची बाजू घेऊ नका ' असे बाबासाहेबांनी , २७ नोव्हेंबर १ ९ ४७ ला जाहीरपणे घोषित केले .
> संयुक्त महाराष्ट्राबाबत डॉ . बाबासाहेबांची भूमिका
• भाषावार प्रांतरचना केल्यास ऐक्य कमी होऊन भारताचे अधिक तुकडे पडतील असे बाबासाहेबांना वाटत होते .• भाषावार प्रांतरचनेचाच निर्णय झाल्यास संयुक्त महाराष्ट्रात उपप्रांत निर्माण न करता एक भाषा एकच प्रांत करावा असे त्यांचे म्हणणे होते .
• मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याने त्याचा समावेश संयुक्त महाराष्ट्रातच केला जावा असा त्यांचा आग्रह होता .
• १ ९ ४८ च्या दारः आयोगाला दिलेल्या निवेदनातही त्यांनी हीच भूमिका मांडली होती .
आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.