Pages

Tuesday, June 2, 2020

महर्षि विठ्ठल शिंदे

   
                 

                      महर्षि विठ्ठल शिंदे 

> जन्म - २३ एप्रिल १८७३ , जामखिंडी ( कर्नाटक )


> १८ ९ ३ फर्ग्युसन कॉलेज , पुणे येथे प्रवेश , मराठा एज्यु , सोसायटी व सयाजीराव गायकवाड यांचे आर्थिक साहाय्य


> १८ ९ ८ - प्रार्थना समाजात प्रवेश .


> १ ९०१-१९ ०३ - अमेरिकेतील युनिटेरियन असो . ने एकेश्वरपंथीय विद्यार्थ्याला धर्माच्या तौलनिक अभ्यासासाठी जाहीर केलेली शिष्यवृत्ती .

• परततांना - अॅमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत ' हिंदुस्थानातील उदार धर्म ' हा प्रबंध वाचला .


> १८ ऑक्टो . १ ९ ०६ - डिप्रेस्ड क्लासेस मिशन सुरू


> १ ९ १२ ला पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राम्हण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम घेतला .


> १ ९ १७ - काँग्रेस अधिवेशनात - शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यता विरोधी ठराव पास ( अध्यक्ष - अॅनी बेझंट )


> १ ९ १७ ला मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेऊन बाबासाहेबांना मानपत्र द्यावे अशी मागणी केली .


> १ ९ २४ - वायकोम ( केरळ ) येथे अस्पृश्य मंदिर प्रवेशात सहभाग . ( साधू शिवप्रसाद यांच्यासोथत )


> १ ९ २८ - पुणे येथे शेतकरी परिषद


> २ जाने . १ ९ ४४ - मृत्यू . पुणे येथे


> डिप्रेस्ड क्लासेस मिशन - १८ ऑक्टो . १ ९ ०६
( मुंबई येथे )

• उद्देश - ( १ ) अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार
            ( २ ) अस्पृश्यांना नोकन्यांच्या संधी मिळवून देणे .
            ( ३ ) अस्पृश्यांच्या अडीअडचणीचे निवारण करणे .
            ( ४ ) अस्पृश्यता निवारण्यासाठी समाजाचा पाठिंबा घेणे .

> कार्य
      ( १ ) अस्पृश्यं मुलांसाठी शाळा उघडणे , वस्तिगृह उघडणे
      ( २ ) अस्पृश्य वस्तीत शिवणकामाचे वर्ग . चालवणे .
      ( ३ ) प्रबोधनासाठी व्याख्याने , कीर्तने आयोजित करणे.
      ( ४ ) आजारी लोकांची सेवा करणे ,

• या संस्थेच्या शाखा त्यांनी अनेक गावात काढल्या . यात त्यांची बहीण जनाक्का यांनीही भाग घेतला .

• अनेक ठिकाणी अस्पृश्यता निवारण परिषदा आयोजित केल्या .


> वि . रा . शिंदे यांच्यावर मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता .


> मॅक्सम्युलर , आगरकर , रानडे , भांडारकर यांच्या लेखनाचा प्रभाव होता .


> १८ ९ ८ च्या आसपास त्यांनी प्रार्थना समाजात प्रवेश घेतला . प्रार्थना समाजाच्या प्रसाराचे कार्य केले . सोबत डॉ . भांडारकर , ना.म. जोशी , रानडे

• प्रार्थना समाजाच्या प्रमुख तत्वांपैकी एक म्हणजे - प्रार्थना हा ईश्वराच्या उपासनेचा आणखी एक मार्ग आहे . परंतु प्रार्थनेने कसल्याही भौतिक पदार्थाची प्राप्ती होत नाही . प्रार्थना भौतिक फलाच्या प्राप्तीसाठी नव्हे तर आत्मिक उत्रतीसाठी करावयाची असते .

• त्यामुळे लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा वि . रा . शिंदे यांनी प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली . ही बाद तेथील मंडळींना खटकली यानंतर वि . रा . शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर केले .


> आधुनिक काळातील महान कलिपुरुष असा द्वारकापीठ
शंकराचार्यांनी त्यांचा निषेध केला होता .


> शेतकरी परिषद १ ९ २८ ला पुण्यात घेतली .

• त्यानंतर मुंबई , तेरदाळ , बोरगाव , चांदवड याठिकाणीही त्यांनी शेतकरी परिषदा घेतल्या .


> मद्यपान , देवदासी पद्धत , मुरळी , शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न केले .


> पंढरपुरात रावजी भोसल्यांचा मदतीने - ' अनाथाश्रम '
त्यांनी स्थापन केलेल्या संस्था
( १ ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन १८ ऑक्टो . १ ९ ०६
( २ ) अ.भा. दलित संघ
( ३ ) अहिल्याश्रम
( ४ ) भारतीय युवक कृषक समाज
( ५ ) ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स


> ग्रंथ
( १ ) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ,
( २ ) माझ्या आठवणी व अनुभव . -

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.