गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर
जन्म - १४ जुलै १८५६ , टेंभू ( कराडजवळ , जि . सातारा )प्राथमिक शिक्षण - कराड
मॅट्रिक - अकोला
१८७८ - पदवी - डेकन कॉलेजात फेलो .
१८७ ९ - एम . ए . करतांना टिळकांबरोबर ओळख .
१ जानेवारी १८८० - ' न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना पुणे येथे , टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची मदत .
१८८१ - टिळकांच्या सहकार्याने - केसरी व मराठा .
कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात - टिळक व आगरकरांना - डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवसांची शिक्षा ,
१८८१-१८८७ - केसरीचे संपादक . १८८७ ला राजीनामा .
१ जानेवारी १८८३ - नुतन मराठी विद्यापीठ स्थापनेत सहभाग. विष्णुशास्त्रीच्या स्मरणार्थ .
२४ ऑक्टोबर १८८४ - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत सहभाग सोबत - टिळक , वामनराव , आपटे , माधवराद नामजोशी , वासुदेव बाळकृष्ण केळकर , महादेव शिवराम गोरे , नारायण कृष्ण धारप , सोंचे याचे प्रमुख आश्रयदाते व अध्यक्ष होते - कोल्हापूरचे शाहू महाराज .
२ जानेवारी १८८५ - फर्ग्युसन कॉलेजची स्थापना . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने .
१५ ऑक्टोबर १८८८ - ' सुधारक ' साप्ताहिक सुरू . संमती वय विधेयकास पाठिंबा .
१८ ९ २ - फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य .
१७ जून १८ ९ ५ - ३ ९ व्या वर्षी दम्यामुळे मृत्यू
त्यांच्यावर वैचारिक प्रभाव होता - हर्बर्ट स्पेन्सर , जॉन स्टुअर्ट मिल तसेच चिपळूणकरांच्या निबंधमालेचा .
पुरस्कर्ते होते - पुनर्विवाह घटस्फोट , संमती विवाह इ . तसेच बुद्धिवाद , व्यक्तिवाद , समता व मानवतावाद इ .
विरोधक होते - सती , केशवपन , बालविवाह , ग्रंथप्रामाण्य व चातुर्वण्य , पुनर्जन्म , पुर्वजन्म .
आधी सामाजिक सुधारणा- या ठाम मताचे . त्यामुळे मतभिन्नता . त्यातून केसरी , मराठा , डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्याशी संबंध तोडले .
आगरकरांचे ग्रंथ - ( १ ) विकारविलसित शेक्सपियरच्या ' हॅम्लेट ' नाटकाचे भाषांतर ( १८८३ ) , ( २ ) डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस ( १८८२ ) , ( ३ ) शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुदरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र ( १ ९ ०७ ) , ( ४ ) गुलामगिरीचे शस्त्र , ( ५ ) वाक्य मीमांसा , ( ६ ) वाक्याचे पृथक्करण , ( ७ ) सुधारकातील वेचक लेख , ( ८ ) केसरीतील निवडक निबंध .
इतर लेखन - ( १ ) अकोल्यातील ' व - हाड समाचार ' या वर्तमानपत्रात लेख , ( २ ) ' सुधारक'चे मराठी संपादक आगरकर , तर इंग्रजीचे गोपाळ कृष्ण गोखले , ( ३ ) प्रसिद्ध लेख ' स्त्रियांनी जाकीटे घातली पाहिजेत ' , ( ४ ) हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ? या निबंधात ब्रिटिशांवर टीका केली .
आगरकरांचे वैशिष्ट्ये
• सुधारक वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य ' इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार .
• वैचारिक लेखांनी - मराठी साहित्यात मोलाची भर घातली . • कवी , काव्य , काव्यरति आणि शेक्सपियर , भवभुति व कालिदास यासारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या टिकाकारांचे लक्ष वेधले .
• विकार विलसितच्या प्रस्तावनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी यासंबंधी मते मांडली .
• मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव व त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला . .
• स्त्रियांच्या शिक्षणाबाबत - विचार मांडतांना आगरकर म्हणतात की - मुलींना मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकवावे .
• ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको .
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.