Pages

Tuesday, June 2, 2020

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले


   

           महात्मा जोतीराव गोविंदराव फुले 


> १ ९ २७ साली म . फुल्यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र पंढरीनाथ पाटील यांनी लिहिले .


> जन्म - ११ एप्रिल १८२७


> मूळगाव - कटगुन ता . खटाव जि . सातारा .


> खरे आडनाव - गोरे पण फुलांच्या व्यवसायातून फुले .


> १८४० - सावित्रीबाईंशी विवाह ( धनकवडी येथील खंडोजी नेवशे ( झगडे ) पाटील यांची कन्या )


> १८४१-४७ - शिक्षण - स्कॉटिश मिशन हायस्कूल ,


> १ जानेवारी १८४८ - बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली .


> १८४ ९ - अस्पृश्यांना शिक्षणावरून वडिलांशी मतभेद झाल्याने पत्नीसह गृहत्याग .


> ३ जुले १८५१ मुलींची दुसरी शाळा बुधवार पेठेतील गावंडे व वाळवेकरांच्या मदतीने .


> १७ सप्टेंबर १८५१ मुलींसाठी तिसरी शाळा - रास्ता पेठेत .


> १५ मार्च १८५२ - मुलींसाठी चौथी शाळा - वेताळ पेठेत .

> १८५२ - शिक्षणक्षेत्रातील या कामगिरीबद्दल - विश्रामबाग वाड्यात - मेजर कॅडी यांच्या हस्ते सत्कार ( पुणे महाविद्यालयाचे डेक्कन कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य )


> १८५२ पुना लायब्ररीची स्थापना .


> १० सप्टेंबर १८५३ - ' महार - मांग इत्यादि लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ' ही संस्था स्थापन .


> १८५५ - रात्रशाळेची स्थापना .


> १८५६ - सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला . शेंडे व कुंभार या मारेक - यांनी जोतीरावांपुढे शरणागती पत्करली .


> १८६० - शेणवी जातीत पहिला पुनर्विवाह घडविला .


>. १८६३ - ' बालहत्या प्रतिबंध गृह ' सुरू . ' यशवंत ' नावाचा मुलगा दत्तक घेतला .


> १८६५ - न्हाव्यांचा एक दिवसाचा संप घडवून आणला . तुकाराम तात्या पडवळ यांच्या ' जातिभेद विवेकसार ' पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते .


> १८६८ - घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला .


> 24 सप्टेबार 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना .


> २५ डिसेंबर १८७३ - सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह लावला .


> सप्टेंबर १८७५ - पुण्यात दयानंद सरस्वतीच्या मिरवणुकीत सहभाग .


> १८७६ - १८८२ पुणे नगरपालिकेचे सभासद होते .


> १८७७ - धनकवडी येथील दुष्काळपीडितांसाठी कॅम्प . जोतीबांच्या प्रेरणेने ' दीनबंधू ' साप्ताहिक सुरू , संपादक कृष्णराव भालेकर .


> १८८० - मिल हँड असो . ची स्थापना ( मुंबई ) नरे व लोखंडे यांच्या सहकार्याने .


> १८८२ - हंटर आयोगापुढे साक्ष , टिळक व आगरकरांची तुरुंगातून सुटका झाल्यावर मुंबईत सत्कार.


> ११ जून १८८५ - मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहून साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यास नकार कळवला .


> १३ जून १८८५ - सत्सार १ चे प्रकाशन .


> २ मार्च १८८८ - ड्युक ऑफ कॅनॉटच्या सत्कार सभेला शेतकऱ्यांच्या वेशात ,


> ११ मे १८८८ मुंबई येथे ' रावसाहेब वडेदार ' यांच्यातर्फे ' महात्मा ' ही पदवी त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले म्हणून तेव्हापासून ते ' महात्मा ' म्हणून ओळखले जाऊ लागले .


> २८ नोव्हेंबर १८ ९ ० - मृत्यू .


> जोतीबा फुलेंवर प्रभाव होता -
     • थॉमस पेनच्या ' द राइटस ऑफ मॅन ' या ग्रंथाचा .
     • अश्वघोषचे - ' वज्रसूची ' उपनिषद - यात जातिभेद खोटा आहे हे तत्त्व .
     • कबीराच्या बीजक ग्रंथातील ' विप्रमति ' या प्रकरणाचा प्रभाव , स्वतःचा उल्लेख एका ठिकाणी - ' कबीर साधूच्या पंथाचा ' असा केला .


> त्यांनी वेद , साहित्य , पुराणे याचाही अभ्यास केला . अनेक संस्कृत ग्रंथही वाचले .


> जातिआधारित हिंदूंची समाजरचना व ब्रिटिशांची शासनव्यवस्था - या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकन्यांची आणि दलितांची दैन्यावस्था , यातून बाहेर पडण्याकरिता एकमात्र उपाय - लोकशिक्षण .


> जोतीबांच्या कार्यातील सहकारी - सदाशिव बल्लाळ गोवंडे , सखाराम यशवंत परांजपे , मोरोपंत विठ्ठल वाळवेकर , डॉ . विश्राम रामजी घोले . तुकाराम तात्या पडवळ , स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारु , व्यंको बाळूजी कालेवार , जाया काराडी लिंगू ना . मे . लोखंडे , कृष्णाजी भालेकर , ताराबाई शिंदे , बाबा पद्मजी .


> महाराष्ट्राचे ' मार्टिन लुथर किंग ' शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे पहिले समाजसुधारक .


> १८४७ -
     • लहुजी बुडा मांग यांच्याकडून नेमबाजी - दांडपट्टा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले .
     • गुरूकन्याचे ९ व्या वर्षी विधवा होऊन मुंडन केलेले तिचे हाल पाहून आघात फुल्यांना आघात बसला .
     • याच वर्षी ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत त्यांचा अपमान झाला होता .


> पुस्तके / ग्रंथसंपदा -
( १ ) नाटक - तृतीय रत्न ( १८५५ ) , ( २ ) छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा ( जून १८६ ९ ) , ( ३ ) ब्राह्मणांचे कसब ( १८६ ९ ) , ( ४ ) अखंडादि काव्यरचना ( १८६ ९ ) , ( ५ ) गुलामगिरी ( १८७३ ) , ( ६ ) शेतकन्यांचा आसूड ( १८ जुलै १८८३ ) , ( ७ ) सत्सार ( द इसेन्स ऑफ टूथ ) अंक -१ ( १३ जून १८८५ ) , ( ८ ) इशारा ( १८८५ ) . ( ९ ) सत्सार अंक -२ ( ऑक्टोबर १८८५ ) , ( १० ) सार्वजनिक सत्यधर्म ( म . फुले यांच्या मरणोत्तर १८ ९ १ मध्ये प्रकाशित .


> हिंदू धर्माच्या चौकटीत सापडलेल्या समाजाची मानसिक गुलामी व शूद्रांचे दैन्य दाखवण्यासाठी - ब्राह्मणांचे कसब , गुलामगिरी , सत्सार हे निबंध लिहिले .
      • यात पुराणातील कथांची ऐतिहासिक दृष्टिकोनातून मीमांसा केली .
      • आर्य - इराणचे होते . भारतदेश जिंकून त्यांनी - शूद्रांना गुलामगिरीत ढकलले .


> ' ब्राह्मणांचे कसब याची अर्पणपत्रिका - " महाराष्ट्र देशातील कुणबी , माळी , मांग , महार यांस हे " पुस्तक ग्रंथकाने परमप्रीतीने नजर केले .


> ' गुलामगिरी ' अर्पण केले - " गुलामांना दास्यात्वातून मुक्त करण्याच्या कामात औदार्य , निरपेक्षता व परोपकार बुद्धी  दाखविणाऱ्या युनायटेड स्टेटस् मधील सदाचारी लोकांना.


> 'शेतक-यांचा  आसूड ' -  शूद्र शेतकऱ्यांच्या बचावाकरिता ' लिहिल्याचे जोतिबांनी म्हटले .
     • बहुजन समाजातील श्रमिकांच्या आर्थिक अवनतीचे चित्रण यात केले तसेच ब्रिटिशांच्या साम्रज्यवादी धोरणापायी भारतीय ग्रामोद्योग व कुटिरोद्योग कसे बंद पडले गेले व ग्रामीण उद्योग व शेती यात आधुनिक तंत्रविज्ञान वापरावे - हा उपायही त्यांनी सुचवला होता .


> इशारा पुस्तिका - ' जोतीबा फुले ' यांनी - न्या रानडे यांच्या ' तीस वर्षांपेक्षा हल्ली शेतकन्यांची स्थिती चांगली आहे . ' . या मताचे खंडण करण्यासाठी होती हे लक्षात येते .


> सार्वजनिक सत्यधर्म ( १८ ९ १ ) - यात ' विश्वकुटुंबवादाची ' सुसंगत मांडणी केली होती तसेच , ' स्वातंत्र्य , समता , बंधुता ' या मूलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजरचना कशी असावी हे सांगितले होते व अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीची तत्त्वे - भारतीय समाजरचनेच्या संदर्भात मांडली.


> इंग्रजांचे राज्य गेले तर पुन्हा पेशवाई येईल - या विचारातून - १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध फसले याचा त्यांना आनंद झाला .


> विधवांच्या केशवपनाला आळा घालण्यासाठी ' तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप , यात सहभागी नारायण मेघाजी लोखंडे , प्रेरणा - सावित्रीबाई .


> छ . शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात स्वत : ला ' कुळवाडी भूषण ' उपाधी लावली . रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था राखावी असे सरकारला निवेदन दिले होते.


> सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने - पहिला विवाह - २५ डिसें १८७३ सीताराम आल्हाट व राधाबाई निंबकर यांचा .


>शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे - महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते .


> खतफोडीचे बंड - पुणे व नगर जिल्ह्यात ज्याला जोतीरावांचा पाठिंबा होता .
     • सावकारशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी झालेले हे शेतकऱ्यांचे बंड होते .
     • जुन्नर तालुक्यात - शेतकऱ्यांचा पहिला असहकार ( कर न देणे ) अडवला .


> जोतीबांचे टिकाकार - विष्णुशास्त्री चिपळूणकर
     • त्यांनी फुल्यांना दिलेल्या पदव्या - ' शूद्रजगद्गुरू व शूद्रधर्मसंस्थापक .


> संस्कृत भाषेतील - ग्रंथ निर्मितीसाठी - सरकारतर्फे मिळणाऱ्या ' दक्षिणा प्राईज ' कमिटीचा पुरस्कार ' मराठी साहित्याला मिळावा यासाठी पुढाकार घेतला .


> जोतीबांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात तीन चळवळी सुरू झाल्या .
     ( १ ) दलितोद्धार चळवळ - सुरुवात- जोतीबांच्या प्रेरणेने - शिवराम कांबळे व गणपतराव फलगावकर .
     ( २ ) कामगार चळवळ - कृष्णराव भालेकर व नारायणराव लोखंडे .
     ( ३ ) ब्राह्मणेत्तर चळवळ - केशवराव जेधे व नारायण जवळकर .


> धार्मिक विचार -
     • थॉमसे पेन प्रमाणे - एकेश्वरवादी .
     • कर्मकांड व रुींवर टीका तरी ते नास्तिक नव्हते . ईश्वराला ' निर्मिक ' म्हणत .
     • सर्वांचा नियंत्रक - निर्मिक.
     • सर्व मानवांचा एकच धर्म असावा , एक धर्म - एक ईश्वर       • मूर्तिपूजा , अवतार कल्पनांना विरोध .
     • ईश्वर उपासनेला मध्यस्थाची गरज नाही .
     • ईश्वरावर विश्वास , सत्याचा शोध आणि नीतीची जोपासना ही तीन तत्त्वे त्यांच्या धर्मविषयक विचारांचा गाभा आहे .
     • ईश्वरनिष्ठ मानवतावाद - धार्मिक विचारांचा पाया.


> सामाजिक विचार -
      • जन्मसिद्ध , नैसर्गिक अधिकाराचे समर्थन
      • वर्णव्यवस्था , जातिभेद , अस्पृश्यता , स्त्रियांवरील अन्याय यावर टीका.
      • स्त्रियांना मानवी हक्कांची जाणीव होऊ नये , या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्यास प्रतिबंध केला , असे मत त्यांनी मांडले . '
      • स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे - असेही ते म्हणत.
      • सामाजिक सुधारणा प्रथम झाली पाहिजे हे त्यांचे मत .
      • सामाजिक सुधारणांबाबत सरकारच्या तटस्थ वृत्तीवर जोतीरावांचा आक्षेप होता .


> शिक्षणविषयक -
     • ब्रिटिशांचे शै . धोरण त्यांना मान्य नव्हते . उच्च वर्णियांसाठी पुष्कळ खर्च होतो पण खेड्यातील लोकांच्य शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नाहीत .
     • १८८२ च्या हंटर आयोगाकडे पाठवलेल्या निवेदनात जोतीबा म्हणतात.
     • खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय करावी .
     • खेड्यात जाण्यास शिक्षक तयार होत नाहीत म्हणून त्यांच्या पगारात वाढ करावी .
     • दलितांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणास प्रोत्साहन म्हणून - शिष्यवृत्ती द्यावी .


> शिक्षण असे असावे की , तरुणांमध्ये स्वत : चा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे .
     • बहुजन समाजातील शिक्षक असावेत .


> महात्मा फुले यांच्या डोळ्यापुढील समाज शोषक व शोषितांच्या रुपात होता .
त्यांनी शेटजी , भटजी व लाटजी यांच्याविरुद्ध शोषित जातींच्या एकजूटीवर भर दिला .
     • वर्ग , जाती हे कृत्रिम भेद नष्ट करून समताधिष्ठित समाज निर्माण करणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते . 

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.