विनायक सावरकर
> सावरकरांचा जन्म - २८ मे १८८३ ला भगूर( जि . नाशिक) येथे.
> पुण्याच्या फर्ग्युसनमधून बी . ए . तर मुंबईला एल . एल . बी. चे शिक्षण घेतले .
> शालेय शिक्षण घेताना दामोदर चाफेकरांना झालेल्या फाशीच्या शिक्षेचा प्रभाव त्यांच्यावर पडला . त्याचप्रमाणे मॅझिनी या इटालियन देशभक्ताचाही त्याच्यावर प्रभाव
होता .
> मित्रमेळा या संघटनेची स्थापना त्यांनी १ जानेवारी १ ९ ०० ला केली ( नाशिक येथे ) गणपती उत्सव साजरा करण्यासाठी स्थापन केली होती .
> अभिनव भारत ( १ ९ ०४ ) - मित्रमेळाचे नामकरण अभिनव भारत केले . या संघटनेवेळी वडील बंधु बाबाराव सावरकर यांची मदत झाली . ही क्रांतिकारी संघटना होती .
> अभिनव भारताची उद्दिष्टे -
( १ ) परदेशात शस्त्र खरेदी करून ती गुप्तपणे भारतात पाठवणे ,
( २ ) भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे ,
( ३ ) स्वदेशी , बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाद्वारे लोकमत तयार करणे .
( ४ ) शक्य तेथे गनिमी काय्याने लढा देणे .
( ५ ) उठावासाठी योग्य संधी शोधणे , सावरकर इंग्लंडला गेले असताना त्यांचे बंधू गणेश ऊर्फ बाबाराव सावरकर अभिनव भारतचे काम बघत . विविध शाखांना भेटी देऊन त्यांनी संघटनेत सुसूत्रता आणली .
• सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई या लष्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड करण्यात आली , यासाठी बाबारावांनी शस्त्रास्त्रे जमवण्याचा प्रयत्न केला . कलकत्त्याच्या त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापाऱ्याकडून बंदूका , रायफली , दारूगोळा इ . साहित्य मिळविले . कोठूरे येथील बर्वेचा वाडा अभिनव भारतचे शस्त्रागार होते .
> अभिनव भारतमधील एका फितूरमुळे बाबारावांना अटक झाली . घराच्या झडतीत आक्षेपार्दा कागदपत्र मिळाली , त्यांची संपत्ती जप्त केली . १ ९ ० ९ ला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली .
> यामुळे संतप्त अनंत कान्हेरेने २१ डिसेंबर १ ९ ० ९ ला कलेक्टर जॅक्सन याचा गोळ्या झाडून खून केला . यावेळी जॅक्सन नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर नाटकमंडळीच्या देवल नाट्य कंपनीमार्फत ' शारदा ' नाटकाचा खास आयोजित कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता.
> कान्हेरेला फाशी देण्यात आली , गणू वैद्य या क्रांतिकारकास पकडले . त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अनेकांना अटक करण्यात आली .
> अभिनव भारताच्या पेण शाखेवर व कोठूरच्या बर्वे वाड्यावर धाड पडली तेथे शस्त्र सापडली . महाडच्या शाखेत दिक्षित व पानवलकरांना पकडले . पुणे शाखेचे सूत्रधार ब्रह्मगिरी बुवांना पकडले . नाशिक , कोल्हापूर , औंध , पंढरपूर येथील क्रांतिकारकांना पकडून शिक्षा दिल्या .
> १ ९ ०६ ला बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले . यावेळी त्यांनी शामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती मिळवली होती .
• तेथे गेल्यावर शामजी वर्माच्या ' इंडिया हाऊस'मध्ये गुप्तपणे बाँम्ब बनवण्याचे कामही चालू गेले व काही पिस्तुले विकत घेऊन भारतात गुप्तपणे पाठवणे सुरू
केले .
> जानेवारी १ ९ १० ला - पॅरिसला गेले . ब्रिटिशांनी राजद्रोहाच्या आरोपाने त्यांना ' फरारी ' घोषित केले व पकड वॉरंट निघाले . पॅरिसमधून लंडनला आले तेथे व्हिक्टोरिया स्टेशनवर त्यांना पकडले .
> यावेळी भारतात आणण्यासाठी त्यांची मोरिया बोटीवरून रवानगी करण्यात आली यावेळी मोर्सेलिस बंदरात
( फ्रान्स ) उडी घेऊन त्यांनी निसटून जाण्याचा प्रयत्न
केला . ( ८ जुलै १ ९ १० ) पण फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले .
> सावकरांना नाशिक येथे आणून त्यांच्यावर खटला भरला . २५ वर्षे जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली . सर्व संपत्ती जप्त करण्यात आली .
> जॅक्सनच्या खूनाला मदत केली म्हणून ३० जानेवारी १ ९ ११ ला सावकरांना दुसऱ्यांदा २५ वर्षांची जन्मठेप
ठोठावली . अंदमानला पाठवले .
> विठ्ठलभाई पटेल व रंगास्वामी अय्यंगार यांच्या मदतीने सावरकरांना अंदमानातून भारतात आणले व रत्नागिरीच्या तुरुगांत ठेवले .
> ६ जानेवारी १ ९ २४ - राजकीय चळवळीत भाग न घेण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली . पण रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडू नये असे बंधन त्यांच्यावर घातले .
> रत्नागिरीत असतांना त्यांचा हिंदु महासभेशी संबंध आला . तेथेच त्यांनी अस्पृश्यता निवारण , सहभोजन , शुद्धीकरण मोहिम इ . कार्याकडे लक्ष दिले . रत्नागिरीला पतितपावन मंदिराची उभारणी केली .
> १ ९ ३७ ला बिनशर्त मुक्तता झाली ( तुरुंगातून ) - १ ९ ३७ ला प्रांतिक सरकारात काँग्रेस अधिकारावर आल्यामुळे कुपर - जमनादास मंत्रिमंडळाने त्यांच्यावरील बंदी उठवली .
> १ ९ ३७ लाच हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली .
> १ ९ ३ ९ हैद्राबादच्या निजामाविरुद्ध सविनय प्रतिकाराची मोहीम सुरु केली .
> हिंदुत्वाची व्याख्या करणारे त्यांचे ' हिंदुत्व ' हे पुस्तक १ ९ २३ ला नागपूरहून प्रसिद्ध झाले .
> साहित्यसंपदा - माझी जन्मठेप , १८५७ चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीच्या चरित्राचे भाषांतर ( इंग्लंडला असताना केले . ) संन्यस्त खड्ग ( नाटक ) , सहा सोनेरी पाने , हिंदुपदपादशाही , हिंदुत्व , कोळे पाणी व कमला
( काव्यसंग्रह ) .
> मृत्यू- २६ फेब्रुवारी १ ९ ६६ .
> हिंदुपदपादशाही या पुस्तकात मराठ्यांना इंग्रजांनी का हरवले याचे समीक्षण करतांना सावरकर स्पष्टपणे लिहितात कि , " हिंदु हे सोळा आणे देशभक्तीत आणि सार्वजनिक हितकारक सदगुणात इंग्रजांच्या मानाने पुष्कळच कमी पडले . "
> १८५७ चा उठावं हा ब्रिटिशांबरोबर भारतीयांची झालेली स्वातंत्र्याची पहिली लढाई होती हे ते निःसंदिग्धपणे सांगतात , त्यांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाला व्हॅलेंटाइन चिरोल यांनी ' ज्वालाग्रही वाङ्मय ' असे विशेषण दिले .
> सावकारांच्या मतानुसार अहिंसा हा सद्गुण असला तरी संपूर्ण अहिंसा नुसती अयोग्यच नव्हे तर अनैतिकसुद्धा
आहे . ते म्हणतात - " आम्ही संपूर्ण अहिंसेच्या तत्त्वज्ञानास झिडकारतो कारण आमच्यात संतप्रवृत्तीचा अभाव असल्यामुळे नव्हे तर आम्ही जास्त वास्तववादी आहोत म्हणून . "
> संपूर्ण जग चांगल्या वृत्तीच्या माणसांचे असते तर हिंसेची गरज असली नसती पण अपरिपूर्ण व दुर्जनांनी भरलेल्या जगात योग्य गोष्टींसाठी हिंसा ही समर्थनीय मानली
पाहिजे . भूमिका संन्यस्त खड्ग या मराठी नाटकात .
> अन्याय दूर करण्यासाठी हाती शस्त्र घेण्याचे समर्थन करतांना ते म्हणतात - " म्हणून ब्रूटसची तलवार पवित्र
आहे . म्हणून शिवाजीची वाघनखेही पवित्र आहेत . म्हणून इटलीतील क्रांतीमध्ये झालेल्या रक्तपातांनी ती घटना सत्कीर्तित दाखल केली गेली आहे . म्हणून पहिल्या चार्ल्सचा वध हे न्याय्य कृत्य आहे . म्हणून विल्यम टेलचा बाण हा पवित्र आहे . "
> हिंदु सामर्थ्यवान सैनिक निघावेत यासाठी सावरकरांनी हिंदुच्या लष्करीकरणावर भर दिला .
> त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत राष्ट्र , वंश व संस्कृती या बाबींवर त्यांनी भर दिला . त्यांचे हिंदुत्वं केवळ धार्मिक नव्हते तर सामाजिक , राजकीय , नैतिक , आर्थिक व सांस्कृतिक घटकांचाही त्यात समावेश होता .
> स्वातंत्र्य अखंड हिंदुस्थानच्या स्वरुपात मिळायला हवे असे त्यांना वाटायचे .
> हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदूस्थानी म्हणावे असे सावरकरांनी सुचवले .
आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Nice
ReplyDelete