MPSC  STORY

Visit our website for preparation of MPSC exam in one place, MPSC, State Service, PSI, STI, STA, MIDC, Police Recruitment, Talathi, Z.P, for preparation of various MPSC exams.

MPSC STORY

Ads Here

Monday, June 8, 2020

विनायक सावरकर

                 

                     विनायक सावरकर

> सावरकरांचा जन्म - २८ मे १८८३ ला भगूर
   ( जि . नाशिक)  येथे.

> पुण्याच्या फर्ग्युसनमधून बी . ए . तर मुंबईला एल . एल .       बी. चे शिक्षण घेतले .

> शालेय शिक्षण घेताना दामोदर चाफेकरांना झालेल्या             फाशीच्या शिक्षेचा प्रभाव त्यांच्यावर पडला . त्याचप्रमाणे       मॅझिनी या इटालियन देशभक्ताचाही त्याच्यावर प्रभाव
   होता .

> मित्रमेळा या संघटनेची स्थापना त्यांनी १ जानेवारी १ ९ ००     ला केली ( नाशिक येथे ) गणपती उत्सव साजरा                   करण्यासाठी स्थापन केली होती .

> अभिनव भारत ( १ ९ ०४ ) - मित्रमेळाचे नामकरण               अभिनव भारत केले . या संघटनेवेळी वडील बंधु बाबाराव     सावरकर यांची मदत झाली . ही क्रांतिकारी संघटना होती .

> अभिनव भारताची उद्दिष्टे -
   ( १ ) परदेशात शस्त्र खरेदी करून ती गुप्तपणे भारतात                पाठवणे ,
   ( २ ) भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे ,
   ( ३ ) स्वदेशी , बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या                               कार्यक्रमाद्वारे  लोकमत तयार करणे .
   ( ४ ) शक्य तेथे गनिमी काय्याने लढा देणे .
   ( ५ ) उठावासाठी योग्य संधी शोधणे , सावरकर इंग्लंडला               गेले असताना त्यांचे बंधू गणेश ऊर्फ                                   बाबाराव सावरकर अभिनव भारतचे काम बघत .                 विविध शाखांना भेटी देऊन त्यांनी संघटनेत सुसूत्रता             आणली .
           • सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई                 या लष्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड करण्यात                   आली , यासाठी बाबारावांनी शस्त्रास्त्रे जमवण्याचा               प्रयत्न केला . कलकत्त्याच्या त्र्यंबक चक्रवर्ती या                   व्यापाऱ्याकडून बंदूका , रायफली , दारूगोळा इ .                 साहित्य मिळविले . कोठूरे येथील बर्वेचा वाडा                     अभिनव भारतचे शस्त्रागार होते .

> अभिनव भारतमधील एका फितूरमुळे बाबारावांना अटक       झाली . घराच्या झडतीत आक्षेपार्दा कागदपत्र मिळाली ,         त्यांची संपत्ती जप्त केली . १ ९ ० ९ ला काळ्या पाण्याची       शिक्षा ठोठावण्यात आली .

> यामुळे संतप्त अनंत कान्हेरेने २१ डिसेंबर १ ९ ० ९ ला         कलेक्टर जॅक्सन याचा गोळ्या झाडून खून केला . यावेळी       जॅक्सन नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर           नाटकमंडळीच्या देवल नाट्य कंपनीमार्फत ' शारदा '             नाटकाचा खास आयोजित कार्यक्रम पाहण्यासाठी आला       होता.

> कान्हेरेला फाशी देण्यात आली , गणू वैद्य या                       क्रांतिकारकास  पकडले . त्याने पोलिसांना दिलेल्या             माहितीनुसार अनेकांना अटक करण्यात आली .

> अभिनव भारताच्या पेण शाखेवर व कोठूरच्या बर्वे                 वाड्यावर धाड पडली तेथे शस्त्र सापडली . महाडच्या           शाखेत दिक्षित व पानवलकरांना पकडले . पुणे शाखेचे         सूत्रधार ब्रह्मगिरी बुवांना पकडले . नाशिक , कोल्हापूर ,         औंध , पंढरपूर येथील क्रांतिकारकांना पकडून शिक्षा             दिल्या .

> १ ९ ०६ ला बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले .           यावेळी त्यांनी शामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती                 मिळवली  होती .
   • तेथे गेल्यावर शामजी वर्माच्या ' इंडिया हाऊस'मध्ये               गुप्तपणे बाँम्ब बनवण्याचे कामही चालू गेले व काही             पिस्तुले विकत घेऊन भारतात गुप्तपणे पाठवणे सुरू
     केले .

> जानेवारी १ ९ १० ला - पॅरिसला गेले . ब्रिटिशांनी                 राजद्रोहाच्या आरोपाने त्यांना ' फरारी ' घोषित केले व           पकड वॉरंट निघाले . पॅरिसमधून लंडनला आले तेथे             व्हिक्टोरिया स्टेशनवर त्यांना पकडले .

> यावेळी भारतात आणण्यासाठी त्यांची मोरिया बोटीवरून       रवानगी करण्यात आली यावेळी मोर्सेलिस बंदरात
   ( फ्रान्स ) उडी घेऊन त्यांनी निसटून जाण्याचा प्रयत्न
   केला . ( ८ जुलै १ ९ १० ) पण फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना       पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले .

> सावकरांना नाशिक येथे आणून त्यांच्यावर खटला भरला .     २५ वर्षे जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात       आली . सर्व संपत्ती जप्त करण्यात आली .

> जॅक्सनच्या खूनाला मदत केली म्हणून ३० जानेवारी १ ९       ११ ला सावकरांना दुसऱ्यांदा २५ वर्षांची जन्मठेप
   ठोठावली . अंदमानला पाठवले .

> विठ्ठलभाई पटेल व रंगास्वामी अय्यंगार यांच्या मदतीने           सावरकरांना अंदमानातून भारतात आणले व रत्नागिरीच्या     तुरुगांत ठेवले .

> ६ जानेवारी १ ९ २४ - राजकीय चळवळीत भाग न               घेण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली . पण           रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडू नये असे बंधन               त्यांच्यावर घातले .

> रत्नागिरीत असतांना त्यांचा हिंदु महासभेशी संबंध आला .     तेथेच त्यांनी अस्पृश्यता निवारण , सहभोजन , शुद्धीकरण     मोहिम इ . कार्याकडे लक्ष दिले . रत्नागिरीला पतितपावन       मंदिराची उभारणी केली .

> १ ९ ३७ ला बिनशर्त मुक्तता झाली ( तुरुंगातून ) - १ ९ ३७     ला प्रांतिक सरकारात काँग्रेस अधिकारावर आल्यामुळे           कुपर - जमनादास मंत्रिमंडळाने त्यांच्यावरील बंदी उठवली .

> १ ९ ३७ लाच हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली .

> १ ९ ३ ९ हैद्राबादच्या निजामाविरुद्ध सविनय प्रतिकाराची       मोहीम सुरु केली .

> हिंदुत्वाची व्याख्या करणारे त्यांचे ' हिंदुत्व ' हे पुस्तक १ ९     २३ ला नागपूरहून प्रसिद्ध झाले .

> साहित्यसंपदा - माझी जन्मठेप , १८५७ चे स्वातंत्र्यसमर व     मॅझिनीच्या चरित्राचे भाषांतर ( इंग्लंडला असताना केले . )     संन्यस्त खड्ग ( नाटक ) , सहा सोनेरी पाने ,                       हिंदुपदपादशाही , हिंदुत्व , कोळे पाणी व कमला
   ( काव्यसंग्रह ) .

> मृत्यू- २६ फेब्रुवारी १ ९ ६६ .

> हिंदुपदपादशाही या पुस्तकात मराठ्यांना इंग्रजांनी का            हरवले याचे समीक्षण करतांना सावरकर स्पष्टपणे                लिहितात कि , " हिंदु हे सोळा आणे देशभक्तीत आणि          सार्वजनिक हितकारक सदगुणात इंग्रजांच्या मानाने              पुष्कळच कमी पडले . "

> १८५७ चा उठावं हा ब्रिटिशांबरोबर भारतीयांची झालेली         स्वातंत्र्याची पहिली लढाई होती हे ते निःसंदिग्धपणे               सांगतात , त्यांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाला             व्हॅलेंटाइन चिरोल यांनी ' ज्वालाग्रही वाङ्मय ' असे विशेषण     दिले .

> सावकारांच्या मतानुसार अहिंसा हा सद्गुण असला तरी           संपूर्ण अहिंसा नुसती अयोग्यच नव्हे तर अनैतिकसुद्धा
   आहे . ते म्हणतात - " आम्ही संपूर्ण अहिंसेच्या तत्त्वज्ञानास     झिडकारतो कारण आमच्यात संतप्रवृत्तीचा अभाव               असल्यामुळे नव्हे तर आम्ही जास्त वास्तववादी आहोत         म्हणून . "

> संपूर्ण जग चांगल्या वृत्तीच्या माणसांचे असते तर हिंसेची       गरज असली नसती पण अपरिपूर्ण व दुर्जनांनी भरलेल्या       जगात योग्य गोष्टींसाठी हिंसा ही समर्थनीय मानली
   पाहिजे . भूमिका संन्यस्त खड्ग या मराठी नाटकात .

> अन्याय दूर करण्यासाठी हाती शस्त्र घेण्याचे समर्थन             करतांना ते म्हणतात - " म्हणून ब्रूटसची तलवार पवित्र
   आहे . म्हणून शिवाजीची वाघनखेही पवित्र आहेत . म्हणून     इटलीतील क्रांतीमध्ये झालेल्या रक्तपातांनी ती घटना             सत्कीर्तित दाखल केली गेली आहे . म्हणून पहिल्या               चार्ल्सचा वध हे न्याय्य कृत्य आहे . म्हणून विल्यम टेलचा        बाण हा पवित्र आहे . "

> हिंदु सामर्थ्यवान सैनिक निघावेत यासाठी सावरकरांनी           हिंदुच्या लष्करीकरणावर भर दिला .

> त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत राष्ट्र , वंश व संस्कृती या          बाबींवर त्यांनी भर दिला . त्यांचे हिंदुत्वं केवळ धार्मिक         नव्हते तर सामाजिक , राजकीय , नैतिक , आर्थिक व           सांस्कृतिक घटकांचाही त्यात समावेश होता .

> स्वातंत्र्य अखंड हिंदुस्थानच्या स्वरुपात मिळायला हवे असे     त्यांना वाटायचे .

> हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदूस्थानी म्हणावे असे                 सावरकरांनी सुचवले .


  आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1 comment:

Please do not enter and spam link in the comment box.