Pages

Tuesday, June 2, 2020

न्यायमूर्ती म . गो . रानडे

   
             

               न्यायमूर्ती म . गो . रानडे

> महाराष्ट्रातील संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक हिंदी अर्थशास्त्राचे जनक , सनदशीर राजकारणाचे संस्थापक


> 1८ जाने १८४२ जन्म- निफाड ( नाशिक )


> प्रा . शिक्षण - कोल्हापूर येथे तर उच्च शिक्षणासाठी १८५८ ला मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला .


> १८६२ ला इतिहास व पॉलिटिकल इकॉनॉमी या विषयात प्रथम श्रेणीत बी.ए. झाले . तसेच , ' इंदुप्रकाश ' वृत्तपत्रातील इंग्रजी विभागात - समाजसुधारणांविषयी लेखन करत असत .


> १८६५ ला एल.एल.बी. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय ' फेलो ' म्हणून नियुक्त . विधवा विवाहोत्तेजक मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ बनले .


> १८६६ भाषांतरकार म्हणून नियुक्ती . अक्कलकोट संस्थानचे कारभारी ( दिवाण ) म्हणून कोल्हापूर येथे न्यायाधीशपदी कार्यरत .

> 3१ मार्च १८४० - मुंबईत प्रार्थना सभा - सहभागी - रानडे , डॉ. आत्माराम पांडुरंग , स.गो. भांडाकर , वामन अथारी मोडक


> १८६८ - एलफिन्स्टन कॉलेजात - इंग्रजी य इतिहासाचे प्राध्यापक म्हणून


> १८६ ९ - एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला .


> १८७१ - पुण्यात बदली सार्वजनिक सभेची सूत्रे ताब्यात घेतली .


> यावर्षी मुंबई सरकारने त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली .


> १८१३ - पहिल्या पत्नीचा मृत्यू वडिलांच्या आहाने - १२ वर्षाध्या कुमारिकेसोबत लग्न . म . गो . रानडेंनी बालविवाहाला विरोध व विधवाविवाहाचा पुरस्कार करूनही स्वतः पालन न केल्याने - त्यांच्यावर समाजातून जोरदार टीका.


> १८८५ - मुंबई इलाख्याच्या विधानमंडळात विधी सदस्य ( Law Member ) म्हणून नियुक्ती . ( मुंबई इलाख्याचे गटईनर )


> १८८७- इंडियन सोशल कॉन्फरन्स ( भारतीय सामाजिक परिषदे ) ची स्थापना न्या . रानडे यांनी केली . त्यामागे प्रयल असे होते की सामाजिक समस्या काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चिला जाव्यात पण काँग्रेसचे पुढारी त्यास अनुकूल नव्हते . म्हणून ही कॉन्फरन्स १८८७ ला काँग्रेस अधिवेशनानंतर आयोजित करण्यात आली . दोघामध्ये वितंडवाद टाळण्यासाठी त्यांनी जाहीर केले की सोशल कॉन्फरन्स काँग्रेस अधिवेशनाच्या दालनात होणार नाही


> १८८९ - Industrial Association of Westem India ची स्थापना ,


>१८९० औद्योगिक परिषद


> १८९३ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती


> १८९६ - टिळकांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतल्यानंतर - रानडेंनी " डेक्कन सभा ' ही संस्था सुरू केली नंतर या संस्थेची जबाबदारी- शिष्य गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर सोपवली . या गुरू शिष्यांची परंपरा अशी होती . न्या . का . त्रिं . तेलंग - न्या . म . गो . रानडे - ना . गो . कृ . गोखले - म . गांधी मृत्यू - १६ जाने . १ ९ ०१ , मुंबई लेखन - एकेश्वरनिष्ठांची कैफियत , इतिहास , शाखे , थोर पुरुषांची चरित्रे , मराठा सत्तेचा उदय ( Rise of Maratha Powar)


> रानडे यांच्या एम.ए.च्या परीक्षेतील उत्तरांचा आशय इतका सुंदर होता की , त्यांच्या उत्तरपत्रिका सर अलेक्झांडर ग्रांट यांनी - एडिनबरो युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी पाठवल्या .


> रानडे - आस्तिक होते - धार्मिक अध्यात्मवाद व तात्विक उदारमतवाद ही त्यांची वैचारिक बैठक


> परमेश्वराचे अस्तित्व मान्य . त्याच्यामुळेच सृष्टी वे निसर्ग नियम - चालतात . ऑगस्ट कॉम्त याच्या विचारांशी सहमत - " माणसाने आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केलेले नैतिक कायदे पाणसातील ईश्वरी अंशाचा साक्षात्कार देतात ,


> अवतार सिद्धांतावर विश्वास नाही . दैववाद , नशीब मान्य नाही .


> रानडेंवर प्रभाव असलेले पाश्चात्य विचारवंत : हेगेल , ऑगस्ट , कॉम्स , स्पेंगलर इ .


> भारतीय समाजातील वैचारिक दास्यांवर ते कायम टीका करत
• वेगळे राहणे
• बुद्धीचा वापर न करणे
• वर्णभेद , व्यक्तिभेद
• नशिबावर हवाला ठेऊन जगणे . यावर टीका


> इंडियन सोशल कॉन्फरन्स - वेगवेगळ्या सामाजिक सुधारणांमधून माणसाची नैतिक पातळी उंचावली - तरच राजकीय व आर्थिक सुधारणा घडून येतील - हा विचार रुजवण्यासाठी रानडे या कॉन्फरन्सचा वापर करत ,


 > समाजसुधारण्यासाठी त्यांनी चार पद्धती सांगितल्या होत्या.
(१ ) पारंपारिक पद्धत - मूळ धर्मग्रंथांचा नवा अर्थ काढायचा व सुधारणांचा पाया त्यात असल्याचे समाजाला पटवून द्यायचे.  स्वामी दयानंद व राजा राममोहनराय यांनी ही पद्धत स्वीकारली होती . उदा . मनुस्मृति , पुराणे - हे एक पलित्वाचा पुरस्कार करतात .

( २ ) वैचारिक बदल - माणसाच्या विचारांचा आवाहन करून बदल घडवून आणायचा . साधने - सभा , व्याख्याने , मुलाखती , पत्रव्यवहार , लेख इ . तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून लोकांमध्ये वैचारिक बदल घडवून आणण्यावर भर दिला .

( ३ ) कायद्याने बदल - राज्याने काही कायदे करावे . ज्याद्वारे सामाजिक समाजसुधारणांना हातभार लागेल .
उदा . ( १ ) विवाहाचे वय निश्चित करावे . मुलाचे १६ ते १८. मुलीचे वय १० ते १२
( २ ) विवाहासाठी - स्थानिक संस्थांची परवानगी द्यावी .
( ३ ) पुरुषाचे वय ४५ पेक्षा अधिक असेल त्यांनी : - कुमारिकेशी लग्न करू नये .
( ४ ) जी मुले - शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग करत नाही - त्यांना विद्यापीठाकडून खास बक्षीस द्यावे .
• याबाबत टिळकांचे मत होते - समाजसुधारणांचे नियम परकीय इंग्रजांना करू देऊ नये ,

( ४ ) क्रांतिकारी पद्धत त्यांना मान्य नव्हती . हेगेल , केशवचंद्रसेन प्रमाणे त्यांचे विचार होते इतिहासाच्या विकासामागे परमेश्वराचा हात असतो . दैवी सत्ता ही मानवी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांचे मत होते म्हणून त्यांच्या मते - ब्रिटिशांचे भारतातील आगमन व त्यांचे इथले शासन हा परमेश्वरी नियोजनाचाच एक भाग होता . ' मराठा सत्तेचा उदय ' या त्यांच्या ग्रंथात त्यांनी  भारतीयराष्ट्रवादाची उत्पत्ती कशी झाले याचे विवेचन केले आहे . मराठ्यांच्या उदयामागे - धार्मिक , सामाजिक कारणे होती . दक्षिणेकडील प्रबोधनाचे ते अपत्य होते .
• भारतीय राष्ट्रवादाची सुरुवात शिवाजी राजांच्या कालखंडात झाली .

> भारत - हे एक राष्ट्र म्हणून - उभे करण्यात - ब्रिटिशांचा महत्त्वाचा भाग होता .


> हिंदू - मुस्लिम यांच्या एकत्रित येण्याची गरज आहे .  ज आहे . 


> सामाजिक पिळवणुकीबद्दल ते म्हणतात
 •" अन्यायाचा घातक परिणाम काय होत असेल तर तो हा की जे अतिशय खालच्या पातळीवर- अन्यायाखाली भरडले जातात ते आपली पिळवणूक करणाऱ्यांचेच हात चाटतात . "
• व्यक्तिस्वातंत्र्यवाद व आदर्शवाद यांचे ते मिश्रण होते .
• ब्रिटिशांच्या कायदा व न्यायपद्धतीवर विश्वास होता .
• उदारमतवादी
• समाजातील सर्व व्यक्तींचा विचार एकत्र
• अॅरिस्टॉटलप्रमाणे - समाज व राज्याचे प्रयोजन - व्यक्तीच्या सुख व कल्याणात



आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.