महात्मा गांधी
» १ ९ २० ते १ ९ ४८ हा कालखंड - गांधी युग म्हणून ओळखला जातो .
» महात्मा गांधी व्यवसायानिमित्त द . आफ्रिकेत गेल्यावर त्यांनी तेथे अहिंसात्मक सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली . अखेर द . आफ्रिका सरकारने नमते घेऊन
१ ९ १४ ला भारतीयांवर अन्यायकारक असलेले कायदे रद्द केले .
» १ ९ १५ ला गांधी भारतात परतल्यावर त्यांनी बिहारच्या चंपारण्यामधील नीळच्या शेतीवर काम करणाऱ्या भारतीय मजुरांना संघटित केले .
» यानंतर सक्रिय राजकारणात त्यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली . इंग्रजांना " सैतान ' म्हणून १ ९ २० ला असहकार चळवळ सुरु केली . सविनय कायदेमंग
( १ ९ ३० ) , वैयक्तिक सत्याग्रह ( १ ९ ४० ) , छोडो भारत चळवळ ( १ ९ ४२ ) या चळवळींमध्ये जनतेचे नेतृत्व पत्करत एका मोठ्या लढ्यासाठी त्यांनी जनतेला जागृत करून संघटित होण्यासाठी प्रयत्न केले .
» स्वदेशी उद्योग व्यवसायांना चालना देणे , दारुबंदी , मिठाचा सत्याग्रह , खेड्यासारखे जनआंदोलन सतत चांगल्या मार्गाचा ध्यास , बुनियादी शिक्षण ( वर्धा शिक्षण योजना ) अशाप्रकारे समाजातील सर्व स्तरांचा समावेश होईल , त्यांना चालना मिळेल , त्यांचा विकास होईल यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले ,
» जनआंदोलनात स्त्रियांच्या वाढत्या सहभागास गांधींच्या चळवळीपासून सुरुवात झाली .
» गांधींचा सत्यावर विश्वास होता . " सत्य म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे सत्य " त्याचप्रमाणे " ईश्वर हेच प्रेम व प्रेम हेच ईश्वर " असे ते म्हणत . काहींच्या मते त्यांचे सत्य हे तत्त्व हिंदु धर्मातील आहे तर अहिंसा तत्त्व बौद्ध व जैन धर्मातून घेतले .
» भारताच्या स्वातंत्र्याबद्दल त्यांचे मत होते " सैतानाशी अहिंसा व असहकाराच्या मार्गाने लढले तर भारताला Panciza fog tones . " ( Freedom for India was to be won through Non - violence & Non - cooperation with the evil - doer . )
» ' यंग इंडिया ' मध्ये गांधी लिहितात - " हिंसेने भरलेल्या वातावरणात अहिंसा तत्त्व अवलंबणारे ऋषीमुनी न्युटनपेक्षा अधिक प्रज्ञावंत होते . तसेच . वेलिंग्टनपेक्षा वीर योदे होते .
» गांधीच्या सत्याग्रहाने लोकांच्या मनात निर्भयता तयार
केली . पोलीस , तुरुंग , अधिकारी याबद्दलची भीती काढून टाकली . गांधीच्या मते - " सत्याग्रह आणि असहकार बोलघेवड्यांची व थापा मारणाऱ्यांची शस्त्रे नव्हेत . त्यासाठी प्रामाणिकपणा हवा ; भरीव मूक त्यागाची तयारी हवी. "
» गांधींचे रचनात्मक कार्यक्रम
( १ ) त्यांना फक्त राजकीय स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर जनतेची सामाजिक , आर्थिक , आत्मिक प्रगतीही अपेक्षित होती . त्यतून त्यांनी ग्रामउद्योग संघ , बेसिक एज्युकेशन सोसायटी , गोरक्षण संस्था स्थापन केल्या .( २ ) समाजातील शोषण संपविण्यासाठी आर्थिक विकेंद्रीकरणाचा मार्ग त्यांनी सांगितला . ' विश्वस्त संकल्पना मांडली . " आपल्या संपत्तीचे आपण मालक नसून विश्वस्त आहोत त्यामुळे गरजेपुरती ठेवून उरलेली समाजाच्या कामी लावावी . "
( ३ ) कुटिरोद्योगांना प्रोत्साहन दिले . त्यांच्या आर्थिक कार्यक्रमाचे प्रतीक खादी होते .
( ४ ) समाजातील विषमता , भेदाभेद , जातीयता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले . १ ९ ३२ मंतर हरिजनांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले . हिंदू - मुस्लिम ऐक्य व दारुबंदीसाठी प्रयत्न केले .
( ५ ) भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजावून सांगताना गांधी हाताची पाच बोटे दाखवत , त्यांच्या मते प्रत्येक बोट म्हणजे सूतकताई , अस्पृश्यता निवारण , नशाबंदी , हिंदु - मुस्लिम स्नेहभाव व स्त्रियांकरता समानता .
» गांधीबद्दल इतर काही विचार
• गांधीच्या जनआंदोलनामुळे शासनाला आव्हान दिले गेले असे सांगून काही विचारवंत त्यांना ' अराजक माजविणारे विचारवंत ' ( a philosophical anarchist )म्हणतात .
• लॉर्ड लिनलियगो - गांधींच्या मार्गाला फसवणूक , ब्लॅकमेलिंग म्हणतो .
• पण गांधी मात्र स्वतःच्या भूमिकेला - सत्याचा मार्ग म्हणतात . " स्वातंत्र्यासाठी मी ३०० वर्षे वाट पहायला तयार आहे पण अनुचित मार्गाचा अवलंब कधीही करणार नाही .
» " मानवी इतिहावर गांर्थीचा प्रभाव हिटलर व स्टॅलिनपेक्षा निश्चितच चिरकाळ टिकेल " - अर्नाल्ड टायन्वी
» " जेव्हा गांधींजी चूक असतात तेव्हा ते आमच्या बरोबर असण्यापेक्षाही अधिक बरोबर असतात . " - आचार्य कृपलानी
» " गांधींजी हे राजकारणातील संत व संतामधील राजकारणी आहेत . "
गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन
» पुणे करारानंतर गांधींच्या सामाजिक कार्यात अस्पृश्यता निर्मूलनाला अग्रक्रम मिळाला .
» पुणे करारात - दलितांना विभक्त मतदारसंघाऐवजी - जागा वाढवून दिल्या . प्रांतिक ७१ वरून - १५७ केल्या . केंद्रीय - राखीव जागा - एकूणच्या १८ % केल्या .
» या आधीच्या - जातीय निवाडा ( १ ९ ३२ ) व विभक्त मतदारसंघ यांचा विचार करता यात दलितांवर होणाऱ्या अन्याय - अत्याचाराबाबत काहीही तरतूद नसल्याने गांधींचा त्याला विरोध होता .
» तसेच एकदा दलितांना स्वतंत्र जमात मानल्यास - अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्नच उद्भवणार नव्हता व त्यामुळे सामाजिक सुधारणांच्या कार्यालाही काही अर्थ उरला नसता असेही त्यांचे मत होते . पुजणांना जरी हौतात्म्ये पत्करावे लागले तरी सवर्ण हिंदुंनी आपल्या धर्मातील असहाय्य स्त्री - पुरुषांवर केलेल्या
» पुणे कराराच्या आधी - गांधी म्हणतात - माझ्या मते माझा जीव फारसा महत्त्वाचा नाही . या उदात्त कार्यासाठी
» यानंतर - अस्पृश्यता निवारणाचे काम त्यांनी हाती घेतले - अत्याचारांचे परिमार्जन होणार नाही . "
• हरिजन सेवक संघाची स्थापना केली
• हरिजन दौरा - ७ नोव्हें . १ ९ ३३ ते २ ९ जुलै १ ९ ३४ वध्यपिासून सुरुवात करून संपूर्ण देशाचा दौरा केला .
» आपल्या संपूर्ण अस्पृश्यता निर्मूलन कार्यात गांधींचा दोन गोष्टीवर भर -
( १ ) सवर्णांकडून अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे .
( २ ) अस्पृश्यतेचे समूळ उचाटन करणे .
» गांधींच्या मते
( १ ) अस्पृश्यतेच्या प्रथेला मुळात हिंदू धर्माचीच मान्यतानाही . जर धर्मग्रंथांमध्ये असा काही उल्लेख असेल तर मानवी प्रतिष्ठेपुढे कोणी मोठे नसल्याने असे धर्मग्रंथही मानू नये .
( २ ) रोटी - बेटी व्यवहार व अस्पृश्यता निर्मूलन - यांची सांगड घालू नये . कारण त्यांच्या मते – रोटी - बेटी पसल बंधने गेलीच पाहिजेत पण ती सवर्ण व अस्पृश्य दोघांमध्ये पाळतात . त्यामुळे खरा भर अस्पृश्यतेमुळे सहन कराव्या लागणान्या अन्यायावर करावा .
( ३ ) अस्पृश्यता निर्मूलन व जातिनिर्मूलन यात फरक – गांधीजी वर्णाश्रम व्यवस्था मानत - या व्यवस्थेत काही दोष असले तरी त्यात अस्पृश्यतेप्रमाणे पाप नाही . अस्पृश्यतेचे निर्मूलन केल्यास वर्णाश्रम पद्धत चांगल्या रीतीने कार्य करेल - यात प्रत्येक जात दुसरीला पूरक असेल के कोणतीही जात - श्रेष्ठ - कनिष्ठ असणार नाही . त्यामुळे जात नष्ट करण्याची गरज नाही . या उलट डॉ . बाबासाहेब म्हणतात - ' अस्पृश्यता हे जातिव्यवस्थेचे फळ आहे . जोपर्यंत जात नष्ट होत नाही . तीपर्यंत अस्पृश्यता कायम राहील .
( ४ ) बाबासाहेब व इतर काही नेते गांधींवर टीका करत तेव्हा गांधींनी टीका समजून घेताना म्हटले . " ज्या समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर वर्षानुवर्षे अन्याय केला त्याचाच मी एक भाग असल्यास - त्यांना माझ्याविषयी अविश्वास वाटणे साहजिकच आहे .
( 5 ) सवर्ण हिंदूंनाही ते म्हणतात - आपल्याला हिंदू धर्म जगवायचा असेल तर आपण - अस्पृश्यतेची प्रथा संपवावी , व जर आपणास अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करायची नसेल तर आपण हिंदू धर्माच्या अस्तित्वाची किंमत मोजण्यास हवी .
( ६ ) अस्पृश्यतेचा प्रश्न सुटल्यास - धार्मिक व इतर प्रश्नांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल . कारण हिंदूधर्मीय लोक बिगरहिंदूंनाही अस्पृश्यासारखेच मानतात , त्यामुळे जर हा प्रश्न सुटला तर सर्व भारतीयांना एकत्र येण्यास वेळ लागणार नाही .
( ७ ) अस्पृश्यतेविरुद्धचा लढा म्हणजे विषमतेविरुद्धचा लढा
( ८ ) यासाठी गांधींचा मार्ग - अहिंसावादी , मतपरिवर्तनावर भर देणारा , हृदयाला आवाहन करणारा होता .
( 9 ) अस्पृश्यता निर्मूलनाची ही चळवळ राजकीय नसून हिंदू धर्म व समाजाच्या शुद्धीकरणाची ती मोहीम आहे यावर त्यांनी भर दिला पण या चळवळीचे राजकीय परिणाम म्हणजे - राष्ट्रीय चळवळीत हा वर्ग कोणत्या ना कोणत्या मार्गाने ओढला गेला .
( १० ) अस्पृश्यांनी स्वत : मध्येही सुधारणा घडवून आणणे करणे अपेक्षित होते .
• शैक्षणिक पात्रता वाढवणे , स्वच्छता - आरोग्याची काळजी घेणे . इ .
» गांधींशी संबंधित स्थळे
( १ ) कीर्ती मंदिर , पोरबंदर ( गुजरात ) - जन्मस्थळ( २ ) फिनिक्स आश्रम व टॉलस्टॉय फार्म . - द . आफ्रिकेतील वास्तव्यात या ठिकाणी सत्याग्रहाची संकल्पना विकसित केली .
( ३ ) मणीभवन ( मुंबई ) -१ ९ १५ ला द . आफ्रिकेतून परत आल्यावर टिळक , गोखले व दादाभाई नौरोजी यांनी त्यांचे स्वागत या ठिकाणी केले होते .
( ४ ) चंपारण्य ( बिहार ) - गांधीचा पहिला सत्याग्रह . १ ९ १७ ते १ ९ ३० या काळातील वास्तव्याचे ठिकाण ,
( ५ ) साबरमती आश्रम ( गुजरात )
( ६ ) मदुराई ( तामिळनाडू ) १ ९ २१ ला गांधींनी पाश्चात्त्य वेशभूषा सोडून पंचा नेसण्यास सुरुवात केली .
( ७ ) आगाखाना पॅलेस ( पुणे ) - १ ९ ४२ ते ४४ च्या काळात तुरुंगात ठेवण्यात आले .
( ८ ) बेलियाघाट ( कोलकाता ) - १५ ऑगस्ट १ ९ ४७ ला गांधी या ठिकाणी होते .
( ९ ) नौखाली ( बांग्लादेश ) भारताच्या फाळणीनंतर झालेल्या दंगली थांबविण्यासाठी गांधींनी येथे आमरण उपोषण केले .
» गांधींच्या जीवनाचा कालपट
• ऑक्टोबर १८६ ९ - पोरबंदर येथे जन्म• सप्टेंर १८८८ - लंडनसाठी रवाना . जून १८ ९ १ ला परत
• मे १८ ९ ३ - गुजराती व्यापाऱ्याचा कोर्टामध्ये दावा चालविण्यासाठी द . आफ्रिकेला
• १ ९ ०६ - भारतीय लोकांसाठी अपमानास्पद ठरलेल्या कायद्याच्या विरोधात सत्याग्रह
• जानेवारी १ ९ १५ - भारतात आगमन
• १ ९ १६ - लखनौ अधिवेशनात सहभाग
• १ ९ १७ चंपारण्य सत्याग्रह
• १ ९ १८ - अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा
• १ ९ २० - असहकार चळवळ
• १ ९ २४ - बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष
• १ ९ २८ - बार्डोली वल्लभभाईंच्या नेतृत्वात चळवळ
• १ ९ ३० - दांडी यात्रा , मिठाचा सत्याग्रह
• १ ९ ३१ - गोलमेज परिषदेसाठी लंडनला
• १ ९ ३२ - गांधी - आयर्विन करार
• मे १ ९ ३३ - आत्मशुद्धीसाठी उपोषण
• १ ९ ४० - वैयक्तीक सत्याग्रहास सुरुवात
• १ ९ ४२ - चलेजाव घोषणा
• २५ ऑक्टोबर १ ९ ४६ - नौखाली सत्याग्रह
• १३ जानेवारी १ ९ ४८ - हिंदू - मुस्लिम दंग्याविरुद्ध उपवास
• ३० जानेवारी १ ९ ४८ नथुराम गोडसेच्या गोळीबारात मृत्यू
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.