Pages

Tuesday, June 2, 2020

महर्षि कर्वे

   
          

                           महर्षि कर्वे 

       " महर्षि अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत . एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार आहेत . " - प्र . के . अत्रे त्यांच्या कार्याचा प्रारंभ विधवा विवाहापासून झाला तर त्याची परिणती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यात झाली .


> जन्म - १८ एप्रिल १८५८ शेरवली , मुरुड ( जि . रत्नागिरी)


> शिक्षण - प्राथमिक शिक्षण मुरुड या गावी झाले . सहावीची परीक्षा देण्यासाठी कुंभार्ली घाटातून पायी चालत सातारा येथे आले . पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले . १८८१ ला मॅट्रिक पास झाले व १८८४ ला मुंबईच्या विल्यम कॉलेजमधून बी. ए. उर्तीण .


> नोकरी - टिळकांनी फर्ग्युसनमधील आपला राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली . एलफिन्स्टन हायस्कूलमध्येही शिक्षकाची नोकरी केली . रानडे , गोखले , नौरोजी , आगरकर यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा घेतली . डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सदस्य होते . ( १ ९ १४ पर्यंत )


> विधवा विवाह
• पंडिता रमाबाई यांच्या ' शारदा सदनमधील ' गोदुबाई या बालविधवेशी विवाह केला . ( १ ९ ८३ ) तिचे नाव आनंदीबाई ठेवले . आश्रमात त्यांना ' बाया ' म्हणत .

• विधवा विवाहाच्या संदर्भात त्यांनी पुरोगामी विचार मांडले होते . ते कृतीत उतरवले त्यावेळी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला .

• विधवा विवाहास चालना मिळावी म्हणून त्यांनी १८ ९ ३ मध्ये विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ / विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापन केली . या संस्थेमार्फत पुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरविण्यास सुरुवात केली .

• पुनर्विवाहाच्या बाबतीत आपली मते लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले .


> अनाथ बालिकाश्रम ( १८ ९९ ) - पुण्याच्या सदाशिव पेठेत सुरु केले व नंतर प्लेगमुळे ही संस्था हिंगणे या ठिकाणी नेली . • यावेळी त्यांना सनातनी लोकांचा विरोध , टीका , अपमान सहन करावा लागला .  परंतु विधवांच्या जगण्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या आश्रमाने केले .


> महिला विद्यालय ( १ ९ ०७ ) - हिंगणे येथे
• सर्वसामान्य मुलींना शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने .


> निष्काम कर्ममठ ( १ ९ १० )
• ब्रीदवाक्य - " लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन , मन , धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे . '

• कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली कारण त्यांना स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करावयाची होती .


> महिला विद्यापीठ ( १ ९ १६ )
• स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे अंत्यत पवित्र देशकार्य , धर्मकार्य आहे , अशी कर्वे यांची श्रद्धा होती . त्यामुळे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे असे त्यांना वाटायचे .

• त्यांनीच सांगितलेली विद्यापीठाची काही वैशिष्ट्ये
( १ ) शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी .
( २ ) इंग्रजी महत्त्वाची भाषा असल्याने तिचेही अध्यापन विद्यापीठात सुरु ठेवले .
( ३ ) स्त्रियांच्या व्यक्तिविकासास पोषक ठरणारे विषय त्यामध्ये देण्यात येतील जसे गायन , आरोग्य , प्रपंचशास्त्र
( ४ ) स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक व्यक्तिभेदास अनुसरुनच विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी .

• या विद्यापीठातील अभ्यासक्रम - प्रशिक्षण पदवी , गृहविज्ञान पदवी , परिचारिका पदवी

• १ ९ २० ला विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांची देणगी विद्यापीठाला दिल्याने या विद्यापीठाचे नादलांच्या आईच्या नावावरून SNDT करण्यात आले .


> महर्षी कव्यांना प्राप्त झालेले बहुमान -

• १ ९ ५२ - बनारस विद्यापीठाची डी . लिट , पुणे व महिला विद्यापीठाची डी . लिट

• १ ९ ५५ पद्मविभूषण

• १ ९ ५८ - भारतरत्न

• मुंबई विद्यापीठाकडून - LL.D.


> ९ नोव्हेंबर १ ९ ६२ - मृत्यू


> महर्षी कव्यांच्या जीवनाचा कालपट

• जन्म - १८ एप्रिल १८५८

• १८७३ राधाबाईशी विवाह

• १८८१ - मॅट्रिक पास

• १८८४ - मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून बी.ए.

• १८ ९ १ फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून

• १८ ९ २ - डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य

• ३१ डिसेंबर १८ ९ ३ - विधवा विवाहोत्तेजक मंडळी

• १८ ९ ५ - विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी

• १८ ९९ - अनाथ बालिकाश्रम ( सदाशिव पेठेत )

• १ ९ ०७ - महिला विद्यालय ( पुणे येथे )

• १ ९ १० - निष्काम कर्ममठाची स्थापना

• १ ९ ११ - महिला विद्यालय हिंगणे येथे

• १ ९ १६ - महिला विद्यापीठाची स्थापना

• १ ९ ३६ - महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना - ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी

• १ ९ ४४ - समता संघाची स्थापना


> अस्पृश्यता व जातिभेद यांच्या निर्मूलनासाठी

• १ ९ ५२ - बनारस , पुणे व महिला विद्यापीठाची डी . लिट

• १ ९ ५५ पद्मविभूषण

• १ ९ ५८ - भारतरत्न

• नोव्हेंबर १ ९ ६२ - मृत्यू .



आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.