Pages

Wednesday, June 17, 2020

दादोबा पांडुरंग तर्खडकर


                दादोबा पांडुरंग तर्खडकर 

                  ( इ . स . १८१४ ते १८८२ )


         " मराठी भाषेचे पाणिनी " म्हणून ओळखले जाणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबई येथे इ.स .१८१४ मध्ये झाला . त्यांचे घराणे हे मूळचे वसई जवळील तर्खर दादोबा पांडुरंग तर्खडकर .
( इ . स . १८१४ ते १८८२ ) वेथील . त्यांचे आजोबा व्यवसायानिमित्त मुंबईत आले व तेथेच स्थायिक झाले . 

► कार्य 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादोबा काही काळ जावरा संस्थानच्या नवाबाकडे त्याने खाजगी शिक्षक म्हणून राहिले . नंतर त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकाचं नोकरी मिळाली . पुढे सुरत येथे सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले . 

►  इ . स . १८४४ मध्ये दादोबा पांडुरंगांनी दुर्गाराम मेहता , दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने सुरत येथे ' मानवधर्म सभा ' या संस्थेची स्थापना केली . या सभेच्या सदस्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती . हिंदू धर्मातील जातिसंस्थेलाही त्यांच विरोध होता . या सभेतील आचार - विचार अतिशय उदार व समता - मानवतावादी होते . या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी ' धर्मविवेचन ' हा ग्रंथ लिहिला . पुढील काळात या संस्थेच्या वाढीसाठी निष्ठावान कार्यकर्ते लाभले नाहीत . त्यामुळे ती संपुष्टात आली . 

►  इ . स . १८४६ मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टरपदी त्यांची नियुक्ती झाली . 

►  इ . स . १८४८ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातील विद्यार्थ्यांनी दादोबा पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ' ज्ञान प्रसारक सभा ' स्थापन केली . ज्ञान प्रसार करणे आणि सामाजिक जागृती घडवून आणणे ही तिची उद्दिष्टे होती . 

►  इ.स. १८४ ९ मध्ये दादोबा पांडुरंगांनी काही जुन्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने मुंबई येथे ' परमहंस सभा ' स्थापन केली . 
         परमहंस सभेची तत्त्वे मानवधर्म सभेच्या तत्त्वांसारखीच  होती . मूर्तिपूजा करू नये , जातिभेद मानू नये , एकेश्वरवादाचा पुरस्कार करणे , विधवा पुनर्विवाहास संमती असावी यांसारख्या तत्त्वांचा स्वीकार परमहंस सभेने केला होता . 
        सभेमध्ये सर्व जाति - धर्माचे लोक येत असत . अतिशय गुप्त पद्धतीने तिचे कामकाज चालत असे सभेच्या आरंभी आणि अखेरीस ज्या मराठी प्रार्थना म्हणण्यात येत असत त्या दादोबांनी रचल्या होत्या . या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी ' पारमहंसिक ब्राह्यधर्म ' या नावाचा काव्यग्रंथ लिहिला होता , त्यात त्यांनी परमहंस सभेची तत्त्वे विशद केली होती . 

► इ . स . १८५२ मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली . या पदावर असताना त्यांनी इ . स . १८५७ च्या भिल्लांचे बंड मोडून काढण्याच्या कामगिरीबद्दल सरकारकडून त्यांना ' रावबहादुर ' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला . 

►  इ.स. १८६० मध्ये कोणी तरी या सभेच्या सभासदांची यादी चोरून ती प्रसिद्ध केली . सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे सभासदात प्रचंड खळबळ उडाली . त्यामुळे शेवटी परमहंस सभेच्या प्रमुखांनी ही संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला . 

► ग्रंथसंपदा 

मराठी भाषेचे व्याकरण , मराठी नकाशाचे पुस्तक , विधवाश्रमार्जन , शिशुबोध , यशोदा पांडुरंगी , मराठी लघु व्याकरण , धर्मविवेचन , पारमहांसिक ब्राह्यधर्म इत्यादी .  

► पुरस्कार 

सरकारकडून त्यांना ' रावबहादुर ' हा किताब देऊन गौरविण्यात आले .  


► विशेषता 

' मराठी भाषेचे व्याकरण ' लिहून त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले ; त्यामुळे ' मराठी भाषेचे पाणिनी ' असा त्यांचा उल्लेख केला 
जातो .

► मृत्यू 

इ . स . १८८२ मध्ये त्यांचे निधन झाले .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                दादोबा पांडूरंग तर्खडकर 

          ( ९ मे १८१४ ते १७ ऑक्टोबर १८८२ )  


►  मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात . मूळ गाव वसईजवळील तर्खड .  

►  शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले . 

►  १८४० ला एल्फिन्स्टन इन्स्टिट्युटमध्ये सुरतला सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त . 

►  १८४४ - सुरत येथे मानवधर्म सभा स्थापन केली . दुर्गाराम मंछराम , दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने . ईश्वर एक आहे , मनुष्यजात एके आहे . धर्म एक आहे परमेश्वरशक्तीसाठी प्रार्थना करावी . सर्वांशी समानतेने वागावे इ . तत्त्वांचा पुरस्कार केला परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संख्या फार टिकली 
नाही . 

►  १८४६ - जांभेकरांचा मृत्यूनंतर ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदांवर निवड . 

►  ज्ञानप्रसारक सभेचे संस्थापक अध्यक्ष . ( १८४८ ) 

►  परमहंस सभा स्थापन ( १८४ ९ ) मुंबई येथे , भिकोबा चव्हाण , राम बाळकृष्ण जयकर यांच्या मदतीने केली . जातिभेदाचा निषेध करण्यासाठी अस्पृश्याने केलेले जेवण , ख्रिस्ती माणसाने बनवलेले पाव , मुसलमानाने आणलेले पाणी पिऊन सर्व सदस्यांना भोजन करावे लागे . ' मी जातीभेद मानणार नाही ' अशी शपथ घ्यावी लागे . यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या कार्याला गती मिळाली . १८६० ला परमहंस सभेच्या सभासदांची यादी चोरीस गेल्यामुळे सामाजिक बहिष्काराच्या सभेचे कार्य बंद केले . 

►  १८५२ ला अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती . भिल्लांच्या बंडाचे बिमोड केल्यामुळे रावबहादुर ही पदवी . निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम केले . या 

►  ग्रंथसंपदा - मराठी भाषेचे . व्याकरण , मराठी नकाशाचे पुस्तक , विद्येच्या लामाविषयी , विधवा श्रुमार्जन , मराठी लघुव्याकरण , धर्मविवेचन , आत्मचरित्र , शिशूबोध इ .

--------------------------------------------------------------------------------------------------–---------–------------------------



अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.