Pages

Wednesday, June 17, 2020

आचार्य बाळशास्त्री जांभेकर



             आचार्य बाळशास्त्री जांभेकर

                  ( इ . स . १८१० ते १८४६ )


             बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोबुर्ले या खेडेगावी 
इ . स . १८१० मध्ये झाला . त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर जांभेका असे होते . त्यांना संस्कृत , मराठी , इग्रजी , 
गुजराती , फारसी या भाषा येत . तसेच ते गणित व भूगोल विषयांत विशेष प्रवीण होते .

► कार्य
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून बाळशास्त्रींची नेमणूक झाली . त्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती 
झाली . कॉलेजात ते बीजगणित व ग्रहगणित हे विषय शिकवीत तसेच मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक , ट्रेनिंग कॉलेजचे संचालक इत्यादी पदांवर त्यांनी कार्य केले .

०  इ . स . १८३० मध्ये म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी चे ' डेप्युटी सेक्रेटरी ' म्हणून नियुक्ती झाली . त्यानंतर दोनच वर्षांनी या संस्थेचे ' नेटिव्ह सेक्रेटरी ' म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली .

०  बाळशास्त्रींनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला . म्हणून त्यांना ' मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ' म्हटले 
जाते . त्यांनी मराठी भाषेतील ' दर्पण ' हे पहिले वृत्तपत्र इ . स . १८३२ मध्ये सुरू केले . दर्पण हे साप्ताहिक होते आणि ते इंग्रजी व मराठी अशा दोन भाषांत प्रसिद्ध होत असे . या पत्रातील इंग्रजी भाग बाळशास्त्री जांभेकर लिहीत व त्याचे मराठी भाषांतर भाऊ महाजन करीत असत .
           दर्पण हे वृत्तपत्र सुमारे आठ वर्षे चालू राहिले . ते बंद होण्याच्या सुमारास म्हणजे इ.स १८४० मध्ये बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी " दिग्दर्शन ' या नावाचे मराठी मासिक सुरू केले .

०  दर्पण व दिग्दर्शन या वृत्तपत्रांतून समाजजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला . त्यांना हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात असे वाटत होते . ते विधवा पुनर्विवाह , स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते . जांभेकर सुधारणावादी असले तरी हिंदू धर्माविषयी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक , आद्य सुधारक , आद्य इतिहास संशोधक , राष्ट्रजागृतीचे अग्रदूत , सुधारणावाद्यांचे प्रवर्तक , आधुनिक महाराष्ट्राचा आद्य ऋषी , व्यासंगी १७ मे १८४६ रोजी त्यांचे अकाली निधन झाले , त्यांना अभिमान होता . म्हणून हिंदू धर्मातून दुसन्या धर्मात गेलेल्या लोकांना हिंदू धर्मात परत घ्यावे , असा त्यांचा आग्रह होता व तसे प्रयत्नही त्यांनी चालविले होते . शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाची नारायण व श्रीपती ही दोन मुले मुंबईत ख्रिस्ती मिशनन्यांच्या शाळेत शिकत होती . त्यातील नारायण याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला . त्याच्यापाठोपाठ श्रीपतीदेखील खिस्ती होऊ नये म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी श्रीपतीच्या वडिलांना हाताशी धरून कोर्टामार्फत श्रीपतीचा ताबा मिळविला . खरे तर श्रीपतीने धर्मांतर केलेच नव्हते . पण तो काही काळ मिशनन्यांनी चालविलेल्या शाळेत राहिला होता म्हणून परंपरानिष्ठ व सनातनी ब्राह्मणांचा श्रीपतीला हिंदू मानण्यास विरोध होता . बाळशास्त्रींनी शुद्धीकरण करून श्रीपतीला हिंदू धर्मात परत घेतले . मात्र या घटनेमुळे सनातनी ब्राह्मणांचा बाळशास्त्रींवर रोष ओढवला आणि त्यांनी बाळशास्त्रींना वाळीत टाकले .

०  महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बाळशास्त्रींनी केले . इतिहास , भूगोल , व्याकरण , गणित , छंदशास्त्र , नीतिशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच रचली होती .

► ग्रथसंपदा
हिंदुस्थानचा इतिहास , इंग्लंडचा इतिहास , हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास , सार संग्रह इत्यादी.

► विशेषता
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक , आद्य सुधारक , आद्य इतिहास संशोधक , राष्ट्रजागृतीचे अग्रदूत , सुधारणावाद्यांचे प्रवर्तक , आधुनिक महाराष्ट्राचा आद्य ऋषी , व्यासंगी पंडित.

► मृत्यू
१७ मे १८४६ रोजी त्यांचे अकाली निधन झाले .



--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


                  आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

                             ( १८१२-१८४६ ) 

►  जन्म - पोमूर्ले ( ता . राजापूर जि . रत्नागिरी ) येथे 
६ जानेवारी १८१२ ला . 

►  बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव म्हणून काम पाहिले . सरकारकडून अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून काम पाहिले . नंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणिताचे असिस्टंट प्रोफेसर झाले . ट्रेनिंग कॉलेजचे संचालक , मुंबई इलाख्यातील शाळांचे इन्स्पेक्टर होते . 

►  पाश्चात्य ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते , विधवा विवाह , स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते , आद्य समाजसुधारक , आद्य इतिहास संशोक , मराठी वृत्तपत्राचे जनक व्यासंगी पंडित .

►  १८४० ला त्यांची जस्टिस ऑफ पीस ' म्हणून नेमणूक 
झाली .

►  त्यांना संस्कृती . इंग्रजी , गुजराथी , बंगाली ,
 फारसी , कानडी या भाषा येत . इतिहास संशोधन , छंदशास्त्र , नीतीशास्त्र यावर पुस्तके लिहिली . 

►  पुस्तके - हिंदुस्थानचा इतिहास . हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास , शून्यलब्धी , सार संग्रह , इंग्लंडचा इतिहास . १८३२ मध्ये ' दर्पण ' हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले . 

►  " दिग्ददर्शन" हे मासिक १८४० ला सुरू .

► १७ में १८४६ ला बनेश्वर येथे मृत्यू .


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.