Pages

Wednesday, June 17, 2020

जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ

     

              जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ

                  (इ. स. १८०३ ते १८६५)


                जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला .  नानांचे घराणे दैवज्ञ ब्राह्मण ( सोनार ) होते . ठाणे जिल्ह्यातील मुरबाड है त्याचे मूळ गाव होय . त्यांचे आडनाव मुरकुटे असे होते . त्यांचे वडील शंकरशेठ यांनी  व्यापारात भरपूर संपत्ती कमावली होती . त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या अठराव्या वर्षीच घरच्या व्यापारधंद्याची जबाबदार नानांवर येऊन पडली . व्यापारधंद्याचा प्रचंड व्याप असतानासुद्धा त्यांना सार्वजनिक कार्याची अत्यंत आवड होती . नानांचा त्या काळातील अनेक सामाजिक , शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता . त्यापैकी बन्याच संस्थाची उभारण त्यांच्याच प्रयत्नाने व पुढाकाराने झाली होती . त्यांच्या या कार्यामुळेच ' आधुनिक मुंबईचे निर्माते किंवा मुंबईचे शिल्पकार ' असे त्यांना ओळखले जाते . 

► कार्य 
० इ.स. १८२३ मध्ये नानांनी बाळशास्त्री जांभेकर , सदाशिवपंत छत्रे इत्यादींच्या सहकार्याने मुंबईत ' बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ' या शिक्षणसंस्थेची स्थापना केली . या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी मुंबई शहरात व मुंबईबाहेरही अनेक शाळा च कॉलेज उघडले . 

० इ.स. १८२ ९ मध्ये लॉर्ड विल्यम बेटिंग याने सतीची चाल बंद करणारा कायदा केला . या कायद्याला भारतातील सनातनी लोकांनी विरोध केला . या कायद्यामुळे भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला . अशा वेळी नानानों महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले . 

० इ.स. १८३६ मध्ये सरकारने सोनापूरची स्मशानभूमी शिवडीला हलविण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे जनतेच्या अनेक गैरसोयी होणार होत्या . जनता या निर्णयाविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत होती . जनतेच्या भावना लक्षात घेऊन नानांनी लोकांच्या गैरसोयी गव्हर्नरांना पटवून दिल्या . शेवटी गव्हर्नरांनी तो निर्णय रद्द केला .
० इ. स. १८३७ मध्ये भिवडी येथे अज्ञात इसमांनी विठ्ठलाची मूर्ती फोडली .  त्यामुळे जातीय दंगल झाली , हिंदूंनी मुस्लिमांच्या विरुद्ध कोर्टात फिर्याद दाखल केली . निकाल हिंदूंच्या विरुद्ध लागला , लोक नानांकडे गेले . नानांनी गव्हर्नरांची भेट घेऊन खटल्याची फेरतपासणी करविली . दंगखोरांना कडक शिक्षा होऊन त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला . 

० इ . स . १८४० मध्ये मुंबई विभागातील शिक्षणव्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी सरकारने ' बोर्ड ऑफ एज्युकेशन ' ची स्थापना केली होती . हे बोर्ड अस्तित्वात असेपर्यंत म्हणजे इ . स . १८४० पासून ते १८५६ पर्यंत नाना त्याचे सदस्य राहिले होते . 

० इ . स . १८४५ मध्ये दादाभाई नौरोजी , डॉ . भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत ' स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ' ही संस्था स्थापन केली . नानांनी या संस्थेला सर्वतोपरी मदत केली . भारतीय समाजात विद्येचा व ज्ञानाचा प्रचार व्हावा आणि येथील युवकांत सार्वजनिक कार्याची आवड उत्पन्न व्हावी हा या संस्था स्थापनेचा उद्देश होता .

० मुंबई विभागाचे गव्हर्नर माऊंट एलफिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांच्या निवृत्तीनंतर स्मारक उभारण्यासाठी नानांनी पुढाकार घेऊन एक फंड जमविला . या फंडातून मुंबईत ' एल्फिन्स्टन कॉलेज ' ची स्थापना त्यांनी केली . तसेच रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरच्या स्मरणार्थ मुंबईत ' ग्रँट मेडिकल कॉलेज ' ची स्थापना करण्यात नानांचा पुढाकार होता . 

० इ . स . १८४६ मध्ये मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती . 

० इ . स . १८४८ मध्ये त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा सुरू केली . यावरून ते स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते हे समजते . 

० इ.स. १८५२ मध्ये जगन्नाथ शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांनी ' बॉम्बे असोसिएशन ' या संस्थेची स्थापना केली , " बॉम्बे असोसिएशन ' ही आधुनिक काळातील भारतातील राजकीय स्वरूपाची पहिलीच संस्था होय , असे म्हणता येईल . 

० इ . स . १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यावर या विद्यापीठाचे फेलो म्हणून नानांची नियुक्ती करण्यात आली . 

► पुरस्कार
० इ. स . १८३५ मध्ये नानांना ' जस्टिस ऑफ द पीस ' चा बहुमान प्राप्त झाला होता . 

► विशेषता 
० आधुनिक मुंबईचे निमति .

► मुंबईचे शिल्पकार
० मुंबईचा अनभिषिक्त सम्राट - आचार्य अत्रे .

► मृत्यू
० ३१ जुलै १८६५ रोजी त्यांचे निधन झाले .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 नाना शंकरशेठ ( १८०३-१८६५ ) - मुंबईचे शिल्पकार 


० जन्म - १० फेब्रुवारी १८०३ , मुरबाड ( जि . ठाणे ) 
येथे , 

० ब्रिटिशांकडून ' जस्टीस ऑफ पीस ' बहुमान , जे.जे. स्कूल ऑफ आर्ट सुरू करण्यात सहभाग . मराठी माध्यम , स्त्री शिक्षण , सतीबंदी व शुद्धीकरणाचा पुरस्कार केला चिंचपोकळी गॅस कंपनी सुरू केली . ते मुंबई कौन्सिलचे पहिले सभासद होते ( १८६२ ) . 

० एलफिन्फ्टनच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सुरू केली . ( १८२२ ) . या सोसायटीने मुंबई व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या . 

० स्टुडंस लिटररी अँण्ड सायंटिफिक सोसायटी ( १८४५ ) ला स्थापन केली यासाठी दादाभाई नौरोजी , भाऊ दाजी लाड यांची मदत झाली . स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली . 

० एलफिन्स्टन कॉलेज काढले . 

० ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू केले . ( रॉबर्ट ग्रँट या गर्व्हनरच्या स्मृती प्रित्यर्थ ) 

० बाँम्बे असोसिएशन ( १८५२ ) , शंकरशेठ व दादाभाई नौरोजी - जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनात आणण्यासठी, 

० मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत ( १८५७ ) महत्वाचा सहभाग व पहिले फेलो . 

० ' नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट 
होते ' - आचार्य अत्रे .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.