Pages

Tuesday, June 16, 2020

विनोबा भावे


                           विनोबा भावे 


► जन्म सप्टेंबर १८ ९ ५ ( गागोदे येथे ) .

► वडील बडोदा येथे गेले नोकरीसाठी गेल्यामुळे पुढील शिक्षण तेथेच घेतले .

► शालेय जीवनातच आजन्म ब्रह्मचारी प्रतिज्ञा घेऊन ती शेवटपर्यंत टिकवली . गांधींसोबत साबरमती आश्रमात 
राहिले . 

► सत्याग्रह आश्रमाची शाखा वाला काढली ( ८ एप्रिल १ ९ २१ ) यासाठी जमनालाल बजाज यांनी आग्रह केला होता . 

► ' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक काढले 
( १ ९ २३ ला ) त्यातून लेखमाला लिहिल्या . उपनिषदांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले . १ ९ २४ ला या मासिकाचे साप्ताहिक वृत्तपत्र केले . या वृत्तपत्रासाठी गोपाळराव काळे , वाळूजकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले . अखेर १ ९ २७ ला हे वृत्तपत्र बंद पडले . 

► नागपूर येथे झेंडा सत्याग्रह ( जून १ ९ २३ ) - विनोबा भावेंसोबत जमनालाल बजाज , विरुळकर , म . भगावनदीन यांनी  सहभाग घेतला होता . यावेळी त्यांना तुरुंगात जावे लागले . हा सत्याग्रह सप्टेंबर १ ९ २३ ला मागे घेतला . 

► वर्धा येथे राष्ट्रीय शाळा काढली . जून १ ९ २८ ला कन्याशाळा काढली नंतर कन्या प्रम काढले . 

► १ ९ ३० च्या सत्याग्रहात वर्धा आश्रमाने चरखा विणण्याच्या तकली गावागावात पोहचवून सक्रीय चळवळ चालवली . 

► शिंदी वृक्ष तोड मोहीम वर्धा जिल्ह्यात शिंदीची खूप झाडे होत
• या झाडापासून चटया , केरसूणी करत पण त्याचा दुसरा दुरूपयोग म्हणजे दारू तयार करण्यासाठी वापर करत . 
• त्यामुळे गोपाळराव वालुंजकर व विनोबा भावे यांच्या प्रयत्नाने ही शिंदी वृक्ष तोड मोहीम हाती घेतली . • मालगुजारांच्या संमतीने त्यांच्याच मालकीची झाडे तोडण्याचा उपक्रम घेतला . 
• सरकारने उपयोगी झाले तोडण्याच्या गुन्ह्यात मालगुजारांवर खटले भरले , दंड केला . 

► मीठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी जंगल सत्याग्रह केला - 
• रानात गुरे चारण्याचा हक्क नव्हता त्यामुळे गवत कापून आणून हा सत्याग्रह करत असत , यावेळी जंगलातील झाडांना हात लावत नसत . 

► विनोबा , धुळे येथे वि . का . राजवाडे स्मारकाच्या उद्घाटनासाठी गेले असता , त्यांनी सार्वजनिक सभांमध्ये केलेल्या भाषणात सरकारला आक्षेपहार्य मजकूर वाटल्याने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली . 
• त्यावेळी धुळे येथील तुरुंगात त्यांना साने गुरुजी , आपटे गुरुजी जमनालाल बजाज यांचा सहवास 
लाभला . 
• जुलै १ ९ ३२ ला त्यांची सुटका झाली . 

► गिताई - १ ९३०-३१ ला गीताई लिहिली . 

► १ ९ ३० च्या चळवळीत वाचा आश्रम जप्त झाला तो परत मिळाला पण विनोबांना तेथे रहावे वाटेना त्यामुळे ते सुरुवातीला नालावडी येथे राहिले नंतर वर्धा - नागपूर रोडवर पवनार येथे आश्रमात रहायला लागले . 

► १ ९ ४० च्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनातील पहिले सत्याग्रही . त्यावेळीही विनोबांना अटक झाली होती . 

► मार्च १ ९ ४८ ला सेवाग्राम येथे रचनात्मक कार्यकर्त्यांचे संमेलन झाले . नेहरा , आझाद , कृपालानी व शंकरदेव हे या ठिकाणी आले असतांना विनोबांच्या प्रेरणेने सर्वोदय समाजाची स्थापना झाली . 

► भारत - पाक फाळणीनंतर दिल्लीला मोठ्या प्रमाणात आलेल्या शरणार्थीच्या सेवेसाठी विनोबा दिल्लीला गेले . 

► नंतरचा प्रवास अजमेर , राऊ ( म . प्र . ) येथे सर्वोदय संमेलन , हैद्राबाद , गुजरात ( बडोदा ) , केरळ , दिल्ली या काळातील भाषणे शांतियात्रा या नावाने प्रसिद्ध . 

► शिवरामपल्ली सर्वोदय संमेलन -
 १ ते ११ एप्रिल १ ९ ५१ . 

► एप्रिल १ ९ ५४ ला बोधगया येथे ६ वे सर्वोदय 
संमेलन . यावेळी जयप्रकाश नारायण यांनी यात सहभाग घेतला

► कर्नाटकातील येलवात येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यासोबत ग्रामदान परिषदेचे आयोजन केले होते . या ठिकाणी बोलतांना विनोबांनी ग्रामदानाला ' संरक्षणाचे साधन ' ( डिफेन्स मेजर ) असे म्हटले . 

► १ ९ ५७ ला त्यांनी ' जय जगत'चा नारा दिला . 

► ऑगस्ट १ ९ ६५ पासून बिहारमध्ये ' तुफान यात्रा ' -६ महिन्यात १० हजार ग्रामदाने करण्यासाठी . 

► विनोबांचे सहा आश्रम ,
• समन्वय आश्रम , बोधगया - १८ एप्रिल १ ९ ५४ - निरनिराळ्या तत्वज्ञानांचा अभ्यास - त्यांच्या समन्वयातून प्रत्यक्ष जीवनाचा प्रयोग .
• ब्रह्मविद्या मंदिर , पवनार - मार्च १ ९ ५ ९ - स्त्रियांच्या सामूहिक साधनेचे स्थान असावे या विचारातून १ ९ ७० नंतर १२ पर्यंत स्वत : विनोबा येथेच राहिले . 
• प्रस्थान आश्रम , पठाणकोठ - येथून पाकिस्तान , काश्मीर , पंजाब - तिन्ही ठिकाणी प्रस्थान करता येईल . 
यातून - ऑक्टो . १ ९ ५ ९ ला स्थापन . 
• विसर्जन आश्रम , इंदौर - १५ ऑगस्ट १ ९ ६० कालबाह्य जुन्या मूल्यांचे विसर्जन व्हावे या उद्देशाने . 
• मैत्री आश्रम - आसाम - मार्च १ ९ ६२ आसाममधील सर्वोदयाचा पाया मजबूत करणे . 
• वल्लभ निकेतन - बेंगलूर - १ ९ ६५ वल्लभस्वामींच्या स्मरणार्थ .

► ब्रह्मविद्या मंदिर , पवनार येथे १ ९ ७ ९ ला विश्व - महिला संमेलन .
• १ ९ ६८ कहलगाव आचार्य कुलाची स्थापना .
• १ ९ ७६ गोहत्याबंदीसाठी - उपवास .
• जाने . १ ९ ८२ देवनार कत्तलखान्यावर सत्याग्रह .
• १६ नोव्हें . १ ९ ८२ मृत्यू . 

► विनोबांचे काही विचार 
• प्रत्येक समस्या अहिंसेने सुटू शकते , पण त्यासाठी हदयशुद्धीची आवश्यकता आहे . 
• भारतात ' Peace Potential ' उद्योगांची गरज 
आहे . 
• राजकारण व धर्मांधता यांच्या मिलनातून सर्वनाश होतो , तर विज्ञान व अध्यात्माच्या मिलनातून सर्वोदय होते . 
A ( अफगाणिस्तान ) , B ( ब्रम्हदेश ) व 
C ( सिलोना श्रीलंका ) हा त्रिकोण आहे ( ABC ) या त्रिकोणाच्या आत देशाचे एक नैसर्गिक संघराज्या व्हावे अशी कल्पना त्यांनी मांडली . 
• भारतात Peace Potential उद्योगांची गरज आहे असे त्यांचे मत होते . 
• जकातमुक्तीमुळे कंपनीची मोठी हानी होत होती . एकंदरीत हा वादाचा विषय बनला . 



अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.