Pages

Tuesday, June 16, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील


                  कर्मवीर भाऊराव पाटील


        कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म इ . स . १८८७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला . त्यांचे गाव ऐतवडे हे होय . त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते . भाऊरावांचे बालपण कुंभोज , तासगाव , दहिवडी , विटा यांसारख्या गावी गेले . त्यांचे प्राथमिक शिक्षणही असेच निरनिराळ्या गावी झाले . भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले . तेथे त्यांनी इंग्रजी सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले . मॅट्रिक होण्यापूर्वीच त्यांना शिक्षण सोडावे लागले . कोल्हापूरच्या सात वर्षांच्या वास्तव्यात त्यांची शालेय शिक्षणात विशेष प्रगती दिसून आली ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले . यापुढे काही दिवस त्यांनी संस्कृत विषयाच्या नाही . याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला आणि शिकवण्या केल्या . 

कार्य 
० काही काळ भाऊराव पाटील यांनी ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लि . या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम केले . त्यानिमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर केलेल्या भ्रमंतीत त्यांना बहुजन समाज अज्ञान व अंधश्रद्धा यांमध्ये पार अडकून गेला असल्याचे आढळून आले . त्यातून त्यांच्यातील समाजसेवक जागी झाला . समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही ही जाणीव झाल्याने त्यांनी महात्मा फुले व राजर्षि शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकायचे ठरविले . 

० इ.स. १ ९ १० मध्ये भाऊराव पाटील यांनी दुधगाव येथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने ' दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ' या नावाची संस्था स्थापन केली . तिच्यामार्फत ' दुधगाव विद्यार्थी आश्रम ' हे वसतिगृह सुरू केले . तेथे सर्व जातिधर्माचे विद्यार्थी एकत्र राहात असत . पुढे दुधगावच्या धर्तीवर नेर्ले व काले या गावीही भाऊरावांनी वसतिगृहे सुरू केली .

० १ ९ १ ९ मध्ये त्यांनी काले येथेच रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली .

० इ.स. १ ९ २४ मध्ये भाऊरावांनी रयत शिक्षणसंस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले .  

० इ.स. १ ९ २४ मध्ये भाऊराव सातारा येथे वास्तव्यास गेले . त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातान्यातच ठेवण्यात आले .

० इ . स . १ ९ ३५ मध्ये भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे “ सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज ' सुरू केले.

 ० इ . स . १ ९ ३७ मध्ये झालेल्या प्रांतिक कायदे मंडळासाठीच्या निवडणुकीत मुंबई प्रांतासह अनेक प्रांतांत काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारावर आली . मुंबई प्रांतांच्या सरकारने जनतेत साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी खाजगी शिक्षणसंस्थांना प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला . 

० भाऊरावांनी या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शाळा उघडल्या . 
इ.स. १ ९ ४० मध्ये भाऊरावांनी सातारा येथे महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने माध्यमिक शाळा सुरू केली . 

० इ.स. १ ९ ४७ मध्ये रयत शिक्षणसंस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाने पहिले महाविद्यालय सुरू केले . 

० इ . स . १ ९५३-५४ या वर्षी संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या ४४ इतकी होती . कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०१ माध्यमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडला होता व आपल्या हयातीत तो पूर्ण केला. 

० भाऊराव पाटील यांची शिक्षण संकल्पना : 
● ' स्वावलंबन , स्वाभिमान , स्वाध्याय व स्वातंत्र्य ' ही शिक्षणाची चतुःसूत्री होती . 
● ' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे रयत शिक्षणसंस्थेचे घोषवाक्य आहे . 
● स्वावलंब शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी ' कमवा व शिका ' ही योजना सुरू केली . 

० पुरस्कार 
• भारत सरकारने ' पद्मभूषण ' हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले . 
पुणे विद्यापीठाने ' डी . लिट ' ही सन्मानदर्शक पदवी त्यांना बहाल केली .  

० विशेषता 
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी भाऊरावांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले होते ,
" भाऊराव का कार्यही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है । ".

० कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अपूतपूर्व क्रांती घडवून आणली . शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखल्यामुळेच ते . सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची जिद्द त्यांनी बाळगली . 

० वडिलांन नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरावे लागल्यामुळे भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले . पाचवीनंतर कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये आले त्यावेळी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था जैन वसतिगृहात झाली . तेथील कडक शिस्त व माऊरावांचा स्वातंत्र्यवादी स्वभाव यामुळे त्यांना पुढे शिक्षण सोडावे लागले .

० अभ्यासाऐवजी कुस्ती , मल्लखांब यामध्ये त्यांना जास्त गति होती . त्यामुळे शाहू महाराजांच्या वाड्यात त्यांना आश्रय मिळाला . तेथे सामाजिक सुधारणांचा वारसा त्यांना मिळाला . 
० शिक्षण बंद झाल्याने अनेक व्यवसाय , कामे करावी लागली . जवाहयाच्या दुकानात काम केले , संस्कृतच्या शिकवण्या घेतल्या . किर्लोस्कर व ओगले कारखान्यातील उत्पादनाचे फिरते एजंट म्हणून काम
 केले . 

० व्यवसायानिमित्त जसजसा त्यांचा प्रवास वाढला , फिरणे वाढले त्यातून एक बाब त्यांच्या निदर्शनास आली की , शिक्षणाला खूप महत्त्व आहे . विचार , उच्चार व वर्तणूक या सर्वांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण ! सत्य , समता , व धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे शिक्षण . 

० जोपर्यंत बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही हे त्यांनी ओळखले . त्यातून विविध शिक्षणसंस्थांची स्थापना त्यांनी आयुष्यभर केली . 

० जातिभेदाला विरोध व समतेचा पुरस्कार करणा - या सत्यशोधक समाजाचा त्यांच्यावर प्रभाव होता . 

० समाजात बदल व्हायचे असतील तर समाजशिक्षण गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले . स्वावलंबन , स्वाभिमान , स्वाध्याय व स्वातंत्र्य या चतुःसूत्रीवर त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची उभारणी झाली होती . 

० भाऊराव पाटलांच्या ' रयत शिक्षण संस्थेचे - 
ब्रीदवाक्य होते. -  " स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद .

० छ . शाहू महाराज व महर्षि कर्वे यांच्या कार्याचा समन्वय म्हणजे कर्मवीरांची वसतिगृहे . वसतिगृहयुक्तशाळा हा त्यांच्या कार्याचा कणा होता . त्यांनी ब्राह्मणेतर अस्पृश्य अश्या समाजातील सर्व घटकांसाठी सामाईक वसतिगृहे स्थापन केली . त्यांच्या संस्थेत जातीभेद , धर्मभेद यांना जागा नव्हती .

० भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ( १ ९ ५ ९ ) तर पुणे विद्यापीठाने डी . लिट पदवी दिली . 

० रयत शिक्षण संस्थेची स्थापना करतांना दत्ताजी पाटील , भाऊराव चौगले , नरुकाका खोत या कार्यकत्यांनी भाऊराव पाटलांना मदत केली . 

० कर्मवीर भाऊराव पाटलांना ' आधुनिक भगीरथ ' असे संबोधले जाते . 

० भाऊराव पाटलांविषयी काही मते 
● " महाराष्ट्राचे बुकर टि वॉरिंग्टन ' ' ह . रा . महाजनी . 

● भाऊराव का कार्यही उनका सचा कीर्तीस्तंम है । " -
 म . गांधी . 
● " कर्मवीर ही एक व्यक्ती नव्हती . ती एक संस्था होती . बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले . त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा " - यशवंतराव चव्हाण , 

भाऊराव पाटलांच्या जीवनाचा कालपट . 
● जन्म २२ सप्टेंबर १८८७ कुंभोज ( कोल्हापूर ) 

● मूळगाव - ऐतवडे , वडील - पायगोंडा . आई - गंगाबाई 

● १९०१-१९ २ ओगले ग्लास वर्क्स या किर्लोस्कर ब्रदर्स लि . कंपनीत . 

● १ ९ १० - बुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना . 

● १ ९ १ ९ - ' रयत शिक्षण संस्था काले ( ता . कराड ) 

● १ ९ २४ रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय ' सातारा येथे नेले . याच संस्थेचे नामकरण १ ९ २७ ला श्री छत्रपती शाहू बोर्डिंग असे केले . 

● १ ९ ३५ - Silver Jubilee Training College 
प्रा . शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी. 

●१ ९ ४० छ . शिवाजी महाविद्यालय हे पहिले कॉलेज . कमवा व शिका योजना सुरु . 

●१ ९ ४२ च्या आंदोलनात भूमिगत क्रांतिकारकांना
 मदत . 

● १ ९ ५ ९ पद्मभूषण , पुणे विद्यापीठाची डि.लिट् . 

● ९ मे १ ९ ५ ९ - मृत्यू .


अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.