अण्णाभाऊ साठे
> जन्म - १ ऑगस्ट १ ९ २० वाटेगाव ( जि . सांगली ) .
> दलितांमधील मातंग समाजात जन्म . त्यांचे मूळ नाव तुकाराम . घरात प्रचंड गरिबी . शिक्षण पूर्ण घेता आले नाही .
> त्यांचे वडील मुंबईला कामाला होते . त्या काळी भायखळ्याच्या कामगार वस्तीमध्ये ते राहत होते .
> लहानपणापासूनच कामगारांच्या जीवनाची ओळख
झाली . संप , मोर्चे आंदोलन या गोष्टी सतत कानावर पडू लागले . त्यातून खूप कमी वयात ते कामगार चळवळीत सहभागी झाले .
> कामगार चळवळीत कार्यरत असतांना त्यांचा कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क आला . त्याकडे ते आकर्षिले गेले . त्यांच्या पक्षकार्यात भाग घेवू लागले .
> लालबावटा कलापथक
• उत्कृष्ट तमाशा कलावंत म्हणून देखील त्यांनी नाव कमावले .• त्याचप्रमाणे ते एक सुप्रसिद्ध शाहीर होते . कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचारासाठी आपल्या कलेचा उपयोग व्हावा म्हणून अण्णाभाऊ साठे , शाहीर अमर शेख , व शाहीर गव्हाणकर यांनी १ ९ ४४ मध्ये ' लाल बावटा ' कलापथकाची स्थापना केली .
• लालबावटा कलापथकासाठी त्यांनी अनेक लावण्या , पोवाडे व वगनाट्ये लिहिली . या पथकाच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचे मोठे कार्य केले .
• स्वातंत्र्य आंदोलन , गोवा मुक्ती आंदोलन , संयुक्त महाराष्ट्र चळवळ या सर्व आंदोलनात त्यांच्या कलापथकाने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून जनतेला जागृत करण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका निभावली .
> साहित्य - १९५० पासून ते लिखाणाकडे वळले .
• त्यांचे शिक्षण जरी फारसे झाले नसले तरी त्यांना आलेल्या दाहक अनुभवातून त्यांनी कथा - कांदबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली .• त्यांच्या लिखाणातून दलितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले .
• कांदबया - फकिरा , वारणेचा वाघ , अलगुज , चित्रा इ .
• कथा कृष्णकाठच्या कथा , गजाआड , ठासलेल्या
बंदुका , बरबाद्या बंजारी .
• वगनाट्य अकलेची गोष्ट , माझी मुंबई , खापऱ्या चोर .
• पोवाडा व लावण्या स्टॅलिनग्राडचा पोवाडा , माझी मैना .
आणखी वाचण्यासाठी........
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.