Pages

Monday, June 8, 2020

अण्णाभाऊ साठे


             

                     अण्णाभाऊ साठे 


> जन्म - १ ऑगस्ट १ ९ २० वाटेगाव ( जि . सांगली ) .

> दलितांमधील मातंग समाजात जन्म . त्यांचे मूळ नाव             तुकाराम . घरात प्रचंड गरिबी . शिक्षण पूर्ण घेता आले           नाही .

> त्यांचे वडील मुंबईला कामाला होते . त्या काळी                   भायखळ्याच्या कामगार वस्तीमध्ये ते राहत होते .

> लहानपणापासूनच कामगारांच्या जीवनाची ओळख
   झाली .  संप , मोर्चे आंदोलन या गोष्टी सतत कानावर पडू       लागले . त्यातून खूप कमी वयात ते कामगार चळवळीत         सहभागी झाले .

> कामगार चळवळीत कार्यरत असतांना त्यांचा कम्युनिस्ट         पक्षाशी संपर्क आला . त्याकडे ते आकर्षिले गेले . त्यांच्या       पक्षकार्यात भाग घेवू लागले .

> लालबावटा कलापथक 

   • उत्कृष्ट तमाशा कलावंत म्हणून देखील त्यांनी नाव                 कमावले .
   • त्याचप्रमाणे ते एक सुप्रसिद्ध शाहीर होते . कम्युनिस्ट              पक्षाच्या प्रचारासाठी आपल्या कलेचा उपयोग व्हावा            म्हणून अण्णाभाऊ साठे , शाहीर अमर शेख , व शाहीर          गव्हाणकर यांनी १ ९ ४४ मध्ये ' लाल बावटा '                      कलापथकाची स्थापना केली .
   • लालबावटा कलापथकासाठी त्यांनी अनेक लावण्या ,           पोवाडे व वगनाट्ये लिहिली . या पथकाच्या माध्यमातून        त्यांनी लोकजागृतीचे मोठे कार्य केले .
  • स्वातंत्र्य आंदोलन , गोवा मुक्ती आंदोलन , संयुक्त महाराष्ट्र      चळवळ या सर्व आंदोलनात त्यांच्या कलापथकाने संपूर्ण        महाराष्ट्राचा दौरा करून जनतेला जागृत करण्याच्या कामी      महत्त्वाची भूमिका निभावली .

> साहित्य - १९५० पासून ते लिखाणाकडे वळले . 

   • त्यांचे शिक्षण जरी फारसे झाले नसले तरी त्यांना                 आलेल्या  दाहक अनुभवातून त्यांनी कथा - कांदबऱ्या           लिहिण्यास सुरुवात केली .
   • त्यांच्या लिखाणातून दलितांच्या दुःखाला वाचा                     फोडण्याचे  काम त्यांनी केले .
   • कांदबया - फकिरा , वारणेचा वाघ , अलगुज , चित्रा इ .
   • कथा कृष्णकाठच्या कथा , गजाआड , ठासलेल्या
     बंदुका , बरबाद्या बंजारी .
   • वगनाट्य अकलेची गोष्ट , माझी मुंबई , खापऱ्या चोर .
   • पोवाडा व लावण्या स्टॅलिनग्राडचा पोवाडा , माझी मैना .



     आणखी वाचण्यासाठी........

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.