Pages

Monday, June 8, 2020

प्रबोधनकार ठाकरे


                     प्रबोधनकार ठाकरे 


> मूळ नाव - केशव सीताराम ठाकरे

> जन्म १७ सप्टेंबर १८८५ , पनवेल . त्यांचे मूळ गाव रायगड     जिल्ह्यातील पाली व हिंदूमधील सीकेपी
   ( चंद्रसेन , कायस्थ प्रभू ) या समाजातून .

> प्रबोधनकारांना त्यांचे नाव - त्यांनी सुरु केलेला ' प्रबोधन '     या वर्तमानपत्रामुळे मिळाले .
   •  कार्यकर्ते व समाजसुधारक होते .
   • त्यांचा लढा जातीयवाद , अस्पृश्यता , बालविवाह ,               विधवा  केशवपन व हिंदुधर्मातील अनिष्ट रुढी प्रथा               परंपरेविरुद्ध होता 
   • त्यांनी ' सत्यशोधक चळवळीतही काम केले .

> १ ९ २१ ला स्वाध्याय आश्रम ही सामाजिक संघटना             स्थापन  केली .
   • उद्दिष्ट- स्त्रियांचे सशक्तीकरण व शोषितांच्या स्थितीत             सुधारणा घडवून आणणे .
   • या संघटनेकडून बऱ्याचदा विधवा विवाहांचे आयोजन           करण्यात आले .

> गोव्यातील देवदासीची प्रथा नष्ट होण्यामागे प्रबोधकार व         त्यांच्या स्वाध्याय आश्रमाचा मोलाचा वाटा होता .

> प्रबोधकारांना अन्याय बिलकुलच सहन होत नव्हता .             बऱ्याचदा त्यांची आंदोलने आक्रमक व जहाल असायची .       १ ९ २६ - मुंबई ( दादर ) येथे गणपती उत्सवाच्या काळात     त्यांनी ब्राह्मण आयोजकांना विनंती केली की , दलितांना         आरतीस बोलवण्यात यावे . प्रबोधनकारांची विनंती मान्य       झाली नाही तेव्हा त्यांनी ती मूर्तीच नष्ट करण्याची धमकी       दिली . त्यावेळी एका दलिताच्या हस्ते पूजा करण्याचे मान्य     करण्यात आले .

> स्वतःला कोणत्याही विचारसरणीत अटकवून घेण्याची           त्यांची ईच्छा नव्हती . काँग्रेस व हिंदु महासभा दोघांच्या         विचारसरणीपेक्षा - त्यांनी स्वतःला - " हिंदू मिशनरी               सोसायटीशी ' जोडून घेतले . ज्यानुसार हिंदू समाजाचे           नेतृत्व हे ब्राह्मणेतर वर्गाकडे असावे .

> त्यांच्यासाठी हिंदुत्व - मूल्य जोपासणारे , सर्वसमावेशक         धोरणावर आधारित होते . त्यांची विचारसरणी संकुचित         नव्हती . मुस्लिम , ख्रिश्चन व इतर कोणत्याही धर्माविषयी       त्यांनी अपशब्द काढले नाहीत . याउलट हिंदू धर्मातील           रुढीवादी ब्राह्मण समाज व त्यांच्या भेदभावाच्या धोरणाचा     त्यांनी कडाडून विरोध केला . ब्राह्मणांचे नेतृत्व व संपूर्ण         समाजव्यवस्थेचा त्यांनी स्वतःकडे घेतलेले मक्ता याचा           त्यांनी विरोध केला .
   पत्रकार म्हणून ' प्रबोधन ' पत्रिका हिंदु समाजातील               सामाजिक , राजकीय व मूल्यांमध्ये सुधारणा घडवून             आणण्याचे विचार मांडले .
    • ब्राह्मणेतर चळवळीचे ते मुख्य पत्रक होते .

> आई - वडिलांची विचारसरणी सुद्धा जातीभेदाला विरोध          करणारी , विषमता सहन न करणारी होती त्यांचा वारसा        प्रबोधनकारांमध्ये आपसूकच आला . लहानपणी जातीय        भेदावर आधारित अनेक लहान - मोठया घटना त्यांना            अनुभवयास आल्या . त्यातून त्यांचे विचार विस्तारत गेले .

> वडीलांनी नोकरी गेल्यानंतर लहानपणी अनेक ठिकाणी         त्यांना स्थलांतर करावे लागले होते - बारामती , मध्य प्रांत       कोलकाता येथेही ते राहिले . या काळात अनेक प्रकारची       कामे करावी लागली . रबर टम्प , साईनबोर्ड बनवाणे ,           पेटिंग करणे , रिपेअरिंग करणे याशिवाय प्रामोफोन
   विकणे , पोलिसी काढणे इ , हळहळू लिखाणात जम             बसल्यावर त्याद्वारे उत्पन्नाचा एक मार्ग मोकळा झाला .         यानंतर १० वर्षे PWD पीडब्लूडी मध्ये काम केले त्यावेळी     हेड क्लापदापर्यंत ते पोहोचले ,

> १ ९ १० ला ला झाले . रमा गुले यांच्याशी अलिबाग येथे ,

> प्रबोधनकार व ब्राह्मणेतर चळवळ 

   • १ ९व्या शतकाच्या अखेरीस फुलेंच्या उच्चवर्णिय ब्राह्मण       वर्गाविरोधी सामाजिक चळवळ सुरु झाली होती .                 फुलेंच्या  सत्यशोधक समाजाने सुरु केलेल्या चळवळीने         शाहू महाराजांच्या काळात चांगला जोम धरला .
   • ब्राह्मण - ब्राहाणेतरांच्या संघर्षात - दोन्ही बाजूंनी                 आपल्या  विचारांच्या प्रसारार्थ वृत्तपत्रांचा वापर करण्यास       सुरुवात केली . अशावेळी महाराजांना गैरब्राह्मण , मतांचे       समर्थन करण्यासाठी - उत्कृष्ट बुद्धिवंत लेखकाची गरज         होती , ती गरज प्रबोधनकारांनी पूर्ण केली . पुढे                   प्रबोधनकार गैरब्राह्मण चळवळीतील महत्त्वाचे सदस्य           बनले . त्यांच्या लेखपीने लोकांना विचारप्रवृत्त केले ,   
   • त्याच काळात महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लिहिणारे
     वि . का . राजवाडे यांच्या ग्रंथांतील मजकुरावरून                 प्रबोधनकारांचा व त्यांचा वाद निर्माण झाला होता .
   • या काळात त्यांनी हे सिद्ध करायचा प्रयत्न केला की             हिंदवी स्वराज्याची स्थापना करतेवेळी अनेक ब्राह्मणेतर         जातीनी ( CKP सारख्या ) महत्त्वाचे योगदान दिले आहे .
   • त्यांच्या प्रभावी लिखाणामुळे शाहू महाराजांनी त्यांना '            कोंदड ' ( Kodund ) उपाधी दिली . शाहू महाराज            त्यांच्या विचारांमुळे फार प्रभावित होत . स्वतःचे                    आत्मचरित्र लिहून देण्यासाठी त्यांनी प्रबोधनकारांना              विनंती केली होती ,

> भाऊराव पाटील प्रबोधनकारांना - मार्गदर्शक समजत
   असत . ते म्हणतात - " रयत शिक्षण संस्था जरी माझी           असली तरी प्रबोधनकारांनी आपली ऊर्जा व जीवन               संस्थेसाठी दिले आहे . ते माझे फक्त गुरुच नाहीत तर             पित्यासमान आहेत . " भाऊराव पाटील व प्रबोधनकार         दोघांनी मिळून अस्पृश्य मुलांसाठी एक वसतिगृह काढले .       दोघांच्या प्रयत्नांची म . गांधींनी स्तुती केली ,

> ' वत्कृत्व शास्त्र ' हे त्यांचे प्रकाशित झालेले प्रथम महत्त्वाचे     पुस्तक , ज्यांचे कौतुक लोकमान्य टिळाकांनी पण केले
   होते . नंतर त्यांनी बरीच नाटके , पुस्तिका व चरित्रे
   लिहिली . त्यांचे आत्मचरित्र ' माझी जीवनगाथा ' सध्या         इतिहासकार व संशोधकांस मार्गदर्शनाची भूमिका
   निभावते .

> त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते -               श्यामची आई , महात्मा फुले , माझी लक्ष्मी इ .

> नवरात्र उत्सव - १ ९ २७ ला खास महाराष्ट्रीयन पद्धतीने         नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली . त्यांनी     संशोधनातून एक गोष्ट सिद्ध केली की , पूर्वी महाराष्ट्रात या     उत्सवाचे आयोजन केली जायचे पण पेशव्यांच्या                  काळापासून ही परंपरा खंडित झाली .

> संयुक्त महाराष्ट्र चळवळीत - त्यांनी महत्त्वाची भूमिका           बजावली , विविध गट पक्ष , व्यक्ती ज्यांच्या विचारसरणी       भिन्न होत्या त्यांना एकाच उद्दिष्टासाठी एकत्र आणण्याचे         महत्त्वाचे काम त्यांनी केले .

> मृत्यू - २० नोव्हेंबर १ ९ ७३

> प्रबोधनकारांचे साहित्य 

   • आत्मचरित्र - माझी जीवनगाथा
   • नाटक।      - खरा ब्राह्मण , संगीत विधीनिषेध , थकलेले                         पोर ,
   • चरित्र        - संत गाडगेबाबा , पंडिता रमाबाई
   • अनुवाद     - हिंदु जनाचा -हास आणि अघःपात
                    - शनिमहात्म्य
                    - शेतकऱ्यांचे स्वराज्य


    आणखी वाचण्यासाठी

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.